राहुरी तालुक्यातील मुळा डाव्या कालव्यावरील गणेश पाणी वापर संस्थेच्या निवडणूकीत जनसेवेचे वर्चस्व.

राहुरी तालुक्यातील मुळा डाव्या कालव्यावरील गणेश पाणी वापर संस्थेच्या निवडणूकीत जनसेवेचे वर्चस्व.
मुळा डाव्या कालव्यावरील गणेश पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक हि अतिशय अटीतटीची झाली असुन यामधे जनसेवा मंडाचे बाजी मारली आहे. जनसेवा प्रणित गणेश शेतकरी मंडळ व जनविकास शेतकरी मंडळ या दोन मंडळात प्रमुख लढत झाली. रविवारी हि मतदान प्रक्रिया संपन्न झाली असुन यामधे ७५ टक्के मतदान झाले. सायंकाळपर्यंत लगेचच मतमोजणी होऊन निवडणूक निर्णयक अधिकारी राजेद्र थोरवे यांनी निकाल घोषीत केला.
कायम बिनविरोध होणा-या या संस्थेची प्रथमच हि निवडणुक लागली होती. तत्पुर्वी चंद्रकला प्रभाकर पवार, सिंधुबाई सुखदेव काळे ह्या दोन संचालीका बिनविरोध झाल्या होत्या. तर ७ संचालक मंडळाच्या जागांकरीता १४ उमेद्वार निवडनुक रींगणात उभे होते. यामधे शिर्ष भागातुन बाळासाहेब पोटे ६६ , रावसाहेब आढाव ६४, कल्पना आढाव ८८, मध्य भागातुन बाळासाहेब खुळे ८७, संतोष काळे ८३,तर टेल भागातुन अभिषेक आढाव ६७, भाऊसाहेब पवार ५८ आदि उमेद्वार विजयी झाले आहेत.