धार्मिक

पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पायी दिंड्यांना माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी समक्ष भेटी घेत दर्शन घेतले

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पायी दिंड्यांना माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी समक्ष भेटी देत दर्शन घेतले दिंड्यातील सहभागी वारकऱ्यांना खाद्यपदार्थाचे पॅकेट वितरीत करण्यात आले मध्यंतरी गेल्या आठ दिवसात राज्यात वेगवान राजकीय घडामोडी झाल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले सरकारमधील सहभागी असलेले तनपुरे यांचेही पद केले करोनाच्या काळात पंढरपूर येथील यात्रा सलग दोन वर्ष बंद होती यावर्षी नव्या उत्साहात मोठ्या प्रमाणात पायी दिंड्या गेलेल्या आहेत सालाबाद प्रमाणे तनपुरे यांनी यावर्षीही पायी दिंड्यांना भेटी दिल्याने वारकरी भारावून गेले राहुरी तालुक्यासह नगर व पाथर्डी येथून मोठ्या संख्येने पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना झालेल्या आहेत आज बुधवारी तनपुरे यांनी नियोजन करत दिंड्यांना भेटी दिल्या पंढरपूर रस्त्यावरील मिरजगाव कर्जत राशीन करमाळा टेंभुर्णी जेऊर या भागात असलेल्या दिंड्यांना भेट देत दर्शन घेतले प्रसंगी काही ठिकाणी वारकरी संप्रदायाचा असलेल्या भगवा ध्वज हातात घेत पायी चालत सहभाग नोंदविला मंत्रीपद गेल्याची कोणतीही खंत व्यक्त न करता उपक्रमात खंड पडून दिला नाही राज्य सरकारमध्ये सहा खात्यांचा कारभार सांभाळत असताना मतदारसंघालाही पुरेसा वेळ देता आला नाही आता मंत्रीपदाची जबाबदारी नसल्याने मतदार संघातील विविध कामे पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण वेळ वापरणार आहे मंत्रीपदासह चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे होते अशाही व्यस्त प्रक्रियेत असतानाही मतदारसंघात पक्ष बांधणी विविध बैठका मुंबई येथील जनता दरबार यशस्वीपणे दिलेली जबाबदारी जोपासली होती मंत्री पदाचा कार्यकाळ केवळ अडीच वर्षाचाच मिळाला त्यातच करोनाची दोन वर्षे गेली आशा ही स्थितीत तनपुरे यांनी वाटचाल चालूच ठेवली आजच्या या उपक्रमात पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे माजी नगराध्यक्ष दशरथ पोपळघट माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी विलास तनपुरे बाजार समितीचे माजी संचालक सुनील मोरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव सडे सेवा संस्थेचे संचालक संदीप पानसंबळ ओबीसी सेल शहराध्यक्ष महेश उदावंत जवखेडेचे सरपंच अमोल वाघ राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे ओंकार कासार उद्योजक पप्पू माळवदे जालिंदर वामन यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते तनपुरे यांनी काही ठिकाणी वारकरी संप्रदायाचा भगवा झेंडा हाती घेत वारकऱ्यांबरोबर पायी चालत सहभाग नोंदविला त्यांच्या या कृतीमुळे वारकरी पूर्णपणे भारावून गेले पंढरपूरच्या मार्गावर असलेल्या दिंड्यांना थेट भेटी दिल्याने अनेकांनी त्यांना धन्यवाद दिले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे