गुन्हेगारी

गणेशवाडी बेडी प्रकरणात सहा महीन्यानंतर पाथर्डी येथील रहिवासी असलेल्या नेवासा येथे कार्यरत असलेल्या पोलीसांवर सोन‌ई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

गणेशवाडी बेडी प्रकरणात सहा महीन्यानंतर पाथर्डी येथील रहिवासी असलेल्या नेवासा येथे कार्यरत असलेल्या पोलीसांवर सोन‌ई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

 

सोन‌ई — नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे दि. 22 जानेवारी रोजी च्या रात्री ११.३० च्या दरम्यान किशोर नारायण डौले यांच्या घरी घडलेल्या घटनेने संपूर्ण गाव अचंबित झाले होते. कारण ही तसेच होते चोरीचा बनाव करत किशोर या तरुणास हातात पोलीस आरोपींना वापरतात ती बेडी घालत चेहऱ्यावर प्लास्टिक पिशवी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. चोरी म्हणाव तर त्यांच्या अंगावरील कुठल्याही दागिन्यांना हात लावला नाही. परंतु त्याचे नशीब बलत्तर म्हणून आई वडिलांना जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. सोनई पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली बेडी जमा केली खरी परंतु त्याचे पुढे काय झाले ति बेडी कुठल्या पोलीस ठाण्याच्या होती व ती कुणाकडे वापरात होती याची कुठल्याही पोलीस ठाण्याच्या रजिस्टर वरती नोंद नाही. मग ही बेडी कुठून कशी व कोणी आणली याचा तपास होणे गरजेचे होते. परंतु पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता तपास गुलदस्त्यात ठेवला. आज बेडीचा वापर झाला उद्या त्यांच्या जवळील पिस्तूलाचा देखील वापर होणार नाही हे कशावरून सिद्ध होईल.दि.१३ मे रोजी फियादीने उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांचे समोर फिर्यादीने आप बिती सांगितली ती पुढील प्रमाणे होती. फिर्यादीचे व आरोपी किरण शिवाजी काटे रा. आखेगाव (काटेवाडी) यांची ओळख होती. फिर्यादी चा काही दिवसांनी विवाह झाला लग्ना पुर्वी काटे व फिर्यादी हे शेजारी शेजारी राहत होते. त्यामुळे त्यांची ओळख होती काही दिवसांनी फिर्यादीचा मोबाईल फेसबुक अकाऊंटवर काटे याने फ्रेंड रिक्वेस्ट आली व तो माझ्या माहेरच्या घरा शेजारचा असल्याने ती रिक्वेस्ट मी स्वीकारली त्यानंतर आमचे मेसेज व्हायचे काही दिवसांनी तो मला म्हणाला मला तुला भेटायचे आहे मी त्याला म्हणाले की तू जोडीने भेटायला ये 2021 मध्ये किरण काटे नेमणूक नेवासा पोलीस स्टेशन आमच्या आखेगाव येथील दत्ता पाराजी मराठे,अमोल काशिनाथ बोरुडे यांच्याबरोबर गणेशवाडी येथे आले .आला त्यानंतर 22 जानेवारी रोजी रात्री साधारण साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घरातील सर्वजण जेवण करून झोपले असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान काटे हा माझ्या पतीसमोर उभा राहिलेला दिसला माझ्या पतीच्या हातात बेडी घालण्याचा प्रयत्न करत होता तोंडावर ऊशी दाबण्याचा प्रयत्न करत होता. झालेल्या घटनेबाबत कोणालाही काही बोलू नको नाहीतर तुझ्या नवऱ्याला व मुलाला मारून टाकीन अशी धमकी देऊन तो निघून गेला. काटे याच्या वागण्यामुळे व घडलेल्या घटनेमुळे माझे सासरी नांदेणे देखील मुश्किल झाले आहे असे फिर्यादीने दिलेल्याजबाबात म्हटले आहे त्यामुळे सोन‌ई पोलिसांनी दाखल गुन्ह्यात वाढीव ३०७, ४५२,५०६हे

 वाढीव कलमे लावले आहेत. रक्षकच जर भक्षक बनत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे असे वरील घटनेवरून दिसून येते आता सोन‌ई पोलीस पो.हे.काॅ.किरण शिवाजी काटे सध्या नेमणूक नेवासा पोलीस स्टेशन याच्या या क्रुत्याबद्दल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे