मुलांना शिक्षकांनी शिकवायचं कधी” – सागर भाऊ शेटे
“मुलांना शिक्षकांनी शिकवायचं कधी” – सागर भाऊ शेटे
शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी वेळ देता येत नाही कारण तर शासकीय विभागातून शिक्षण बाह्य रोज नवनवीन जीआर पारित करून शिक्षकांकडून त्याची अंमलबजावणी करून घेतली जाते. अशी शेकडो अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागत असल्याने मुलांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही परिणामी त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांवर होताना दिसून येत आहे. शाळेची गुणवत्ता घसरत असल्याकारणाने तसेच शाळाबाह्य शैक्षणिक कामे देण्याचे बंद करावे या मागणीसाठी शिक्षक संघटना समन्वय समितीने 6 सप्टेंबरला जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
असे शैक्षणिक कामे करून घेताना जिल्हा परिषद सीईओ यांनी खाजगी ॲप कंपल्सरी वापरण्याचे आदेश देत हजेरी असो व दुसरे कामे केलेली वैयक्तिक माहिती त्या ॲपमध्ये तसेच फोटो व्हाट्सअपवर फोटो टाकण्याचे आदेश दिले. असेच हजेरी देखील खाजगी ॲप मध्ये भरवायचे असल्याने अन्यथा पगार दिला जाणार नाही अशी धमकी वजा सूचना ही सीओ यांनी केल्यामुळे हे निर्णय फक्त नगर जिल्ह्यातच कस काय लागू करू शकतात हाही शिक्षकांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.
या कारणाने 6 सप्टेंबर पासून सर्व शिक्षक प्रशासकीय ग्रुप मधून बाहेर पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य शासनाच्या आदेशाव्यतिरिक्त मनमानी करत कोणतेही आदेश पारित करत शिक्षकांना नको ते कामे देऊन जिल्हा परिषद शाळेचा दर्जा कमी करण्याचे काम नगर जिल्ह्यात सध्या चालू असल्याचे पालक वर्गात बोलले जात असून पालक वर्गात चिंतेचे वातावरण पहावयास मिळत आहे.
शासन स्तरावर काय कारवाई होते हे येणाऱ्या काळात दिसून येईल.
या प्रश्नावर राष्ट्रीय श्रीराम संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख यांनी बोलताना सांगितले की शिक्षकांना नको ती कामे देऊन शिक्षणावरील शिक्षकांचे लक्ष कमी होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. गरीबातील गरीब मुलांची ही शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात असून तो तात्काळ थांबावा अन्यथा जिल्हा परिषद शाळेसाठी राष्ट्रीय श्रीराम संघ संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ बेग हे ही शिक्षणासाठी रोड वरती येणार तसेच बदलापूर येथील घटना अतिशय निंदणी असून असा प्रश्न कोणत्याही शाळेत होत असेल तर व कोठेही होत असल्यास राष्ट्रीय श्रीराम संघ, रुद्र न्यूज यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन संपर्कप्रमुख सागर भाऊ शेटे यांनी केले आहे