भेर्डापुरातील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संचाचे वाटप

भेर्डापुरातील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संचाचे वाटप
श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व कामगार संघटनेचे नेते श्री गणेश छल्लारे यांच्या सहकार्याने व अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री प्रफुल्ल बाळासाहेब दांगट व पत्रकार दत्ता जानराव यांच्या सहभागातून
दिनांक १४ऑगस्ट रोजी श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर गावातील जवळपास ३० बांधकाम कामगार मजुरांना अहमदनगर येथे बांधकाम कामगार विभागात संसार उपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले . यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे युवक नेते श्री सिद्धार्थ मुरकुटे यांनी अहमदनगर येथे बांधकाम विभागात सदिच्छा भेट दिली . तसेच यावेळी बांधकाम कामगारांच्या प्रगतीपथासाठी कामगार नेते श्री गणेश भाऊ छल्लारे यांनी सांगितले की कामगारांना आज संसार उपयोगी भांडे संच वाटप केले आहे, कामगारांच्या मुलांना शालेय शिष्यवृत्ती लाखों रूपये देण्यात आली , यापुढे पण शिष्यवृत्ती मिळवून देण्यात येईल व कामगारांना घरकुल योजना, बांधकाम कामगार विमा ,अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहिल.
श्रीरामपूर तालुक्यात व भेर्डापूर गावात बांधकाम कामगारांना विद्यमान कामगार नेते श्री गणेश भाऊ छल्लारे यांच्या अथक प्रयत्नाने संसार उपयोगी भांडे संचाचे वाटप होत असल्याने अशोकचे संचालक प्रफुल्ल दांगट व पत्रकार दत्ता जानराव यांनी श्री गणेश भाऊ छल्लारे यांचे आभार व्यक्त केले आहे.