आष्टी गावाचा नादच खुळा;बैलासमोर नाचविले गौतमी पाटीलला-कार्यक्रमास नव्हता एकही माणूस

आष्टी गावाचा नादच खुळा;बैलासमोर नाचविले गौतमी पाटीलला-कार्यक्रमास नव्हता एकही माणूस
सबसे कातिल” असे जिला म्हटले जाते त्या गौतमी पाटीलची संपूर्ण महाराष्ट्रात एकच हवा आहे.जिथे जिथे गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या त्या ठिकाणी गर्दीचा पूर वाहू लागतो. आत्तापर्यंत वाढदिवस, लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमात हजारोंच्या समोर गौतमीने आपली अदाकारी पेश केली.मात्र आता गौतमीच्या लावणीचा एक बैलही दिवाणा झाल्याचे पाहायला मिळाले.मुळशीत बावऱ्या बैलासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी फक्त बैलच होते.
नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते.गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे.अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात.तिचे मानधनही गब्बर असते.तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते.गौतमी आणि वाद हे एक समीकरणच आहे.
सुशील हगवणे युवा मंचाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी स्टेज बांधला होता.प्रचंड मोठ्या आणि मोकळ्या मैदानात पाय ठेवायला जागा उरली नसती मात्र प्रत्यक्षात याठिकाणी एकही माणूस नव्हता. गौतमी पाटील आली, नाचली पण तिच्यासमोर एकही माणूस प्रेक्षक म्हणून नव्हता. तर गौतमी बावऱ्या या शर्यतीतल्या बैलासमोर नाचली.बावऱ्या हा एक बैल आहे.मात्र अनेकांचा सुरुवातीला मोठा गैरसमज झाला.बावऱ्या हा एखादा राजबिंडा पुरुष असावा त्यातल्या त्यात आमदार,नेता किंवा मोठा माणूस असावा, असे अनेकांना वाटले. मात्र हा मुळशी या गावाचा एक लाडका बैल आहे.बावऱ्या गावाची शान असून त्याला पाहण्यासाठी दुरुन दुरुन लोक येतात.मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.मात्र बावऱ्या हा मुख्य आकर्षण आणि प्रेक्षक होता.