राज्यपाल भगत सिंग कोशारी यांचा आळंदी शहर शिवसेनेने महा विकास आघाडी मार्फत केला निषेध*

*राज्यपाल भगत सिंग कोशारी यांचा आळंदी शहर शिवसेनेने महा विकास आघाडी मार्फत केला निषेध*
*छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ जमा होत जोरदार घोषणा बाजी*
महाराष्ट्र राज्याचे बाबत सतत द्वेष भावना ठेवली असल्याचे कृत कृतीतून वारंवार दाखवणाऱ्या राज्यपाल भगत सिंग यांचा आळंदीतील शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला आहे,महा विकास आघाडीच्या माध्यमातून हा निषेध नोंदवला असलेच शिवसेना नेते उत्तम गोगावले यांनी सांगीतले आहे, भगत सिंग कोशारी यांनी गुजराती मारवाडी लोक जर मुंबई तून बाहेर गेले तर मुबई ला आर्थिक राजधानी कोणी म्हणणार नाही, हे चीड येणाऱ्या वक्तव्याचा महाराष्ट्र भर राग व्यक्त केला जात आहे , यावेळी शिवसेना नेते उत्तम गोगावले, माजी नगरसेवक आनंदा मुंगसे,राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, यांनी मनोगतातून निषेध नोदवला, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शहर प्रमुख अविनाश तापकीर, आशिष गोगावले शशी राजे जाधव, मंगेश तीताडे, बालाजी शिंदे, अनिकेत डफळ, राहुल सोमवंशी, संदीप पगडे, राकेश जाधव, युवा कार्यकर्ते हजर होते, श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापाशी जोरदार राज्यपाल भगत सिंग यांच्या निषेध बाबत घोषणाबाजी झाली,दरम्यान महाराष्ट्राच्या बाबत दूषित भावना वारंवार दिसून येत असताना, आमच्या महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या मराठी हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल यांना महामहीम राष्ट्रपती यांनी परत बोलवावे,अशी मागणी तमाम आळंदीतील शिवसैनिक यांनी घोषणा बाजी करत दिली आहे,