चांदा येथे चोरटाचा हल्लात एकाचा मृत्यृ तर दोन गंभीर जखमी.

चांदा येथे चोरटाचा हल्लात एकाचा मृत्यृ तर दोन गंभीर जखमी.
सोनई-काल मध्यराञीच्या सुमारास चांदा लोहार वाडी रस्त्यावर असलेल्या कर्डीले वस्तीवर चोरट्याने अंगणात झोपलेले फिर्यादी नवनाथ ज्ञानदेव कर्डिले तसेच त्यांचे नातेवाईक जेवन करून झोपले असताना मध्ये रात्रीच्या साडे बारा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरा शेजारी राहणारे चुलते गंगाधर कर्डिले यांच्या घराबाहेर जेवन करून झोपलेला असताना फिर्यादी व त्यांचा चुलतभाऊ बापु कर्डिले,गंगाधर कर्डिले यांना जबर दुखापत करून ओमकार गंगाधर कर्डिले वय-22 याच्या डाव्या मानेवर बाजुस व जबाडा जवळ सुराने दुखापत करून बाबाखान शिवाजी भोसले रा.गोंडेगाव याच्या सह अनोळखी साथिदाराने ठार मारले.तर चुलती अर्चना कर्डिले हिच्या गळातील मणीमंगळसुञ पंधरा हजार रूपये किमतीचे मणी व डोरले इ.ऐवज चोरटानी लंपास केला.या घटनेतील एक आरोपीस फिर्यादीने ओळखले असुन त्याचे नाव बाबाखान शिवाजी भोसले रा.गोंडेगाव ता.नेवासा येथील रहिवासी असल्याचे समजते.या चोरी घटनेबाबत नेवासा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असुन मयत ओमकार कर्डिले हा आईवडिलांना एकलुता एक मुलगा होता.तसेच तो हैद्राबाद येथे आय.टी इंजिनियर म्हणुण नोकरी करत होता.पुढील.महिन्यात त्याला अमेरिकेत नोकरीसाठी जायचे असल्याचे समजते.या घटनेचा सोनं,ई पोलीस ठाण्यात गुन्हा र न 73/2022भा द वि कलम 302*394*397प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा तपास सोनई पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षिक सचिन बागुल करत आहेत. दरम्यान घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील श्रीरामपूरचया अडिशल पोलीस अधीक्षक स्वाती भोर शेवगाव उप अधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी भेट देऊन तपासा बाबत सुचना दिल्या आहेत. कोट. ओमकार गंगाधर कर्डीले हा आई वडिलांचा एकुलता एका मुलगा होता तो आय टी कंपनीत हैदराबाद येथे महिना अडीच लाख रुपये पगारावर नोकरी करत होता पहिल्या पासुन अत्यंत हुशार होता त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे