बेलापूरातील श्रीगणेश विसर्जन स्थळाची अप्पर पोलीस अधिक्षक यांच्याकडून पहाणी

बेलापूरातील श्रीगणेश विसर्जन स्थळाची अप्पर पोलीस अधिक्षक यांच्याकडून पहाणी
बेलापुर (प्रतिनिधी )- गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये या करीता अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी बेलापुर येथील प्रवरा नदीवरील गणपती विसर्जन जागेची पहाणी करुन बेलापुर ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचा योग्य त्या सुचना दिल्या , बेलापूरात एकुण सोळा गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असुन सर्व गणेश मंडळ गणेश विसर्जन हे बेलापूर नदीवरील पुलाजवळच करत असतात तसेच प्रवरा नदीला पाणी असल्यामुळे श्रीरामपुर येथील गणेश मंडळेही गणपती विसर्जन करण्याकरीता बेलापुरला येतात त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीरामपुरच्या पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत गणेश विसर्जन स्थळाला भेट दिली. या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे व ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी गणेश विसर्जन नियोजनाबाबत माहीती दिली या वेळी आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करा बँरेकेट़्स लावा सीसीटीव्ही कँमेरे बसवा गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी संबधीतांना दिल्या .गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोहणाऱ्या तरुणांची टिमही तयार ठेवण्यात आली असुन तीच मुले नदी पात्रात जावुन गणेश विसर्जन करतात इतरांना खोल पाण्यात जावु दिले जात नाही तसेच या ठिकाणी बँरेकेट़्स तसेच ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी नगरपालीकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे हवालदार अतुल लोटके हरिष पानसंबळ पत्रकार देविदास देसाई ,विशाल आंबेकर रमेश अमोलीक तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.