जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन व बांधकामाचा शुभारंभ.

टाकळीभान येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन व बांधकामाचा शुभारंभ.
टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर नियोजित जागेमध्ये श्री संत तुकाराम महाराज मंदिर कामाचे भूमी पूजन व व बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रम अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.
यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रतिमेचे पूजन करून विधिवत पूजा संपन्न झाली. तदनंतर जागेचे भूमिपूजन व कुदळ टाकून मंदिर बांधकामाचा शुभारंभ संपन्न झाला व मंदिर कामास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ह.भ. प.दत्तात्रय बहिरट महाराज, गावातील मान्यवर पदाधिकारी, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर ट्रस्ट विश्वस्त,भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यापासून मंदिर निर्माण साठी मंदिर विश्वस्त कमिटी व ग्रामस्थ यांनी गावातील घरोघर जाऊन वर्गणी जमा केली व त्यास देणगीदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन वर्गणी जमा झाली. त्यामधून या मंदिर नियोजित जागेमध्ये सुंदर सुबक आकर्षक असे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभे राहणार आहे.
या भूमिपूजन व शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी गावातील भाविकांनी रोख स्वरूपात देणग्या जमा करून मंदिर बांधकामास सहकार्य केले. या कार्यक्रम प्रसंगी द्वारकानाथ भालसिंग , रोहिदास पटारे, लहान भाऊ पवार, बंडोपंत पटारे,अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, अशोकचे कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच भाऊसाहेब मगर, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी चेअरमन राहुल पटारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पटारे,दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब पवार, प्राचार्य जयकर मगर, भास्करराव कोकणे,नानासाहेब लेलकर,लहान भाऊ नाईक, ऍड.धनराज कोकणे, रामनाथ पटारे,अजित थोरात,श्रीकृष्ण वेताळ,भाऊ कोकणे ,मुकुंद हापसे,अनिल पटारे, आबासाहेब रणनवरे, अभिजीत लेलकर,रामेश्वर आरगडे, राजेंद्र माने,संजय पटारे, सुधीर मगर, अजित थोरात रवींद्र भालसिंग, गोरख खुरुद ,सुरेश गायकवाड, राहुल कोकणे आदींसह जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर टाकळीभान ट्रस्ट सर्व विश्वस्त, किसनगिरी बाबा भक्त मंडळ सदस्य, गावातील मान्यवर पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.