कब्रस्तान जागेवर जगविली मुस्लिम बांधवांनी 180 झाडे…

टाकळीभान कब्रस्तान जागेवर जगविली मुस्लिम बांधवांनी 180 झाडे…
टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथील मुस्लिम बांधवांनी टाकळीभानच्या गणेश खिंडरोडला असलेल्या कब्रस्तान जागेवर मागील वर्षी जून महिन्यात 180 झाडांचे वृक्षारोपण केले होते. 28 जुलै रोजी वृक्ष संवर्धन दिवस या दिवशी या झाडांची पाहणी करून झाडांना पाणी देण्यात आले, झाडांचे यशस्वीरित्या जतन व संगोपन करून या मुस्लिम बांधवांनी पर्यावरण बचावाचा अनोखा संदेश याद्वारे दिला आहे. वर्षभर या झाडांच्या संगोपनासाठी येथील बांधव सहकारी आपला वेळ काढून निरंतर, वृक्षांना पाणी देणे, त्या वृक्षांची काळजी घेणे, आदी कामे नित्य नेमाने करत असतात, त्यांच्या या मेहनतीचे व कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, त्यांनी ही झाडे जगवल्याबद्दल निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्जुन राऊत यांनी त्यांना धन्यवाद दिले आहे. येथील वृक्षारोपण केल्यानंतर या बांधवांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यातून या झाडांना सातत्याने पाणी मिळावे या दृष्टिकोनातून बोर सुविधा उपलब्ध केली असून सर्व झाडांना ड्रीपची सुविधा केली आहे. या कब्रस्तानच्या ठिकाणी वड, चिंच, लिंब , सागवान, आवळा अशी सावली देणारी व गुणकारी झाडे त्यांनी लावली व जगवली आहेत, या कामी सर्वश्री अश्फाक शेख, अल्ताफ भाई शेख, राज मोहम्मद शेख सर, भैया पठाण, नसीर बेग, नूर मोहम्मद पठाण, नवाज भाई शेख,मोहम्मद शेख, राजू पठाण, मेहराज शेख, अहमद पठाण, अजिज शेख, समीर शेख, आदींचे या वृक्षरोपण व संवर्धनासाठी मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांच्या या पर्यावरणाच्या बांधिलकीबद्दल ग्रामस्थांना त्याबद्दल विशेष आपुलकी व कार्याबद्दल अभिमान वाटत आहे.