संपादकीय
रामगिरी महाराज यांची टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी व श्रीराम मंदिरास भेट.

रामगिरी महाराज यांची टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी व श्रीराम मंदिरास भेट.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील पुरातन असलेल्या श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर व श्रीराम मंदिरास श्री. क्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती गुरूवर्य रामगिरी महाराज यांनी भेट
देवून श्री. विठ्ठलाचे व प्रभु रामाचे दर्शन घेतले.
यावेळी श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर देवस्थानचे पुजारी, पत्रकार विजय देवळालकर यांनी रामगिरी महाराज यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार केला. यावेळी रामगिरी महाराज यांनी श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर व श्रीराम मंदिराची पहाणी केली व पुरातन असलेल्या या दोन्ही मंदिरा विषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी ह. भ. प. दत्तात्रय महाराज बहिरट, दिगंबर पांडे, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष डाॅ. श्रीकांत भालेराव, मधुकर महाराज, रामभाऊ महाराज उपस्थित होते.
टाकळीभान— येथील पुरातन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर व श्रीराम मंदिरास श्री. क्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी भेट देवून दर्शन घेतले. यावेळी श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने विजय देवळालकर यांनी
रामगिरी महाराज यांचा सत्कार केला.