मुलींचा पाठलाग करून छेड करणाऱ्या टाकळीभान मध्ये जमावाचा चोप
संतप्त जमावाने छेड काढणाऱ्यांची दुचाकी पेटवली

मुलींचा पाठलाग करून छेड करणाऱ्या टाकळीभान मध्ये जमावाचा चोप
संतप्त जमावाने छेड काढणाऱ्यांची दुचाकी पेटवली
टाकळीभान प्रतिनिधी : वडाळा येथून दुचाकी वर टाकळीभान येथे बस थांब्यावर दोघांनी पाठलाग करून येथील मुलींची छेड काढली असता ग्रामस्थांनी व जमावाने अजय राजू मोरे यास पकडून चोप दिला असून दुसरा अक्षय दत्तात्रय विटकर तरुण निष्डून पळून गेला. तर अजय मोरे यास पोलीस येईपर्यंत गावातील तरुणांनी गाळ्यामध्ये डांबून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले. जमावाने भर रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना जमावाने चांगला चोप दिला असून संतप्त झालेल्या जमावाने त्या तरुणांची दुचाकी पेटवून दिली.
सविस्तर वृत्त असे की गावातील मुली कॉलेज वरून ये जा करत असतात सदर दोन तरुण चार-पाच दिवसापासून मुलींचा पाठलाग करत होते व मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न करत होते. सदर प्रकारचा त्रास मुलींनी पालकांना सांगितला होता. त्यानुसार कॉलेजची वेळ संपल्यानंतर बस थांब्यावर मुली उतरल्या असता सदर दोन तरुणांनी गाडीवर येऊन मुलींची छेड काढली त्यावेळी पालक समोरच होते. त्यामुळे पालक व नागरिकांचा पारा चढला. दोघेजण मोटरसायकलवर पळाले पालकांनी त्या गाडीचा पाठलाग करून मोरे याला धरले तर दुसरा विटकर पळण्यात यशस्वी झाला. व धरलेल्या तरुणास जमावाने चांगला चोप दिला व त्याला पोलीस येईपर्यंत गळ्यामध्ये डांबून ठेवले. तोपर्यंत संतप्त जमावाने त्या छेड काढणाऱ्या तरुणांची दुचाकी पेटवून दिली.
व त्या धरलेल्या तरुणास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन व कराळे यांच्या स्वाधीन केले. व दुसरा पळणारा तरुण यास पोलीस उपअधीक्षक पथकाने पकडले. गेल्या चार-पाच दिवसापासून या तरुणांचा मुलींना त्रास होत असल्याने संतप्त पालक व जमावाने त्यांना चांगलाच चोप दिला, घटनास्थळी तातडीने अप्पर पोलीस उपाधीक्षक वैभव कुलबर्मे, विभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे व तालुक्याचे प्रभारी पीआय नितीन देशमुख , पी एस आय संजय निकम यांनी घटना स्थळी हजर झाले, रात्री उशिरापर्यंत आरोपी अक्षय दत्तात्रय विटकर , अजय राजू मोरे राहणार श्रीरामपूर येथील लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय जवळील यांच्या विरोधात 74,78,,127(2),3,(5) बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून अधिनियम कलम 8, 12 प्रमाणे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे आरोपींना अटक करण्यात आले आहे ,