गेवराई शहरात व ग्रामीण भागात वाळू तस्करीसह अवैध धंदे फोफावले

गेवराई शहरात व ग्रामीण भागात वाळू तस्करीसह अवैध धंदे फोफावले
गेवराई पोलिसांच्या कारभार म्हणजे मी मारतो तू रडल्यासारखे कर……!
*गेवराई शहरात वाळू तस्करीसह अवैध धंदे फोफावले
* महसूल व पोलिस प्रशासन मलिदा गिळून गप्प
* सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री
* महसूल व पोलिस प्रशासन मलिदा गिळून गप्प
* सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री
* गेवराई पोलिस ठाणे हद्दीत जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या पथकाकडून वारंवारं कारवाया तर ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी अर्थपूर्ण बसत आहेत गप्प.
गेवराई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या मुकसंमतीने शहरात व ग्रामीण भागात पोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत . न्यामध्ये विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री , अवैध लॉटरी , सट्टा मटका , गुटखा विक्री , अवैध वाळू , अवैध ऑनलाईन चक्री असे विविध
बेकायदेशीर धंदे फोफावले आहेत . हे – सर्व चालू असताना महसूल व पोलिस प्रशासन अर्थपूर्ण व्यवहार करून गप्प बसत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे . वारंवारं कारवाया केल्या जात असल्या तरी कोणत्याही प्रकारचा परिणाम अवैध धंद्यावर होत नसल्याचे दिसून येत आहे.
याउलट गेवराई शहरा बरोबरच ग्रामिन भागात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असताना देखील त्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध अद्यापपर्यंत आले नाहीत . गेवराई पोलिस ठाणे हद्दीत जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या वेगवेगळ्या पथकाकडून अवैध धंद्याच्या विरोधात कारवाया केल्या जातात . मात्र स्थानिकच्या महसूल अथवा पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी काहीच करत नसल्याचे चित्र आहे . गेवराई शहर व ग्रामिन भागात खुलेआम अवैध धंदे सुरू असून या ठिकाणचे महसूल व पोलिस प्रशासन सर्व काही खुलेआम चालत असताना आर्थिक देवाण घेवाण करीत असल्याची चर्चा नागरीकांतून होत आहे . त्याचबरोबर अवैध वाळू उपसा , मटका , पत्त्याचे क्लब , जुगार बिनबोभाटपणे सर्व काही सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे . ग्रामीण भागात देखील अशाच प्रकारची परिस्थिती आहे . मटका , जुगार आणि देशी विदेशी दारू विक्री करताना दादागिरी करत असल्याचे चित्र दिसते . यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागतो . तसेच गुटखा , सुगंधी तंबाखूच्या विक्रीस बंदी घालण्यात आली आहे . तरी देखील याची तस्करी करून हा मालराज्यात येतो . त्याच अनेक ठिकाणी मलिदा लाटला जातो . हे सर्व उघडपणे चालत असताना पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेते . त्याचबरोबर अवैध वाळू उपसा पोलिस अधिक्षकांचे पथक येऊन वाळू पट्ट्यात कारवाई करते मात्र स्थानिक महसूल व पोलिस प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरीकांमध्ये होत.
गेवराई पोलीस स्टेशन व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयीन परिसरात भोवती मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याची जाळे निर्माण झालेले असल्याने या परिसरातील नागरिक हवालदिल झालेले असतानाच शहर व ग्रामीण भागात पोलीस निरीक्षक पेरगुलवार यांच्यामुळे अवैध धंदे बोकाळले असतानाच व त्यांनी आर्थिक मालिदा गोळा करण्यासाठी ठेवलेल्या आपल्या मर्जीतील विश्वासू कर्मचाऱ्यांमुळे शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढल्याने नागरिकांना मोकळा श्वास घेणे कठीण झाले असून या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी दखल घेऊन संबंधित अवैध धंदे व त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.