*चकलांबा गावांतर्गत रस्ते चिखलमय तात्काळ रस्ता दुरुस्त करा नसता अंदोलन करु*

*चकलांबा गावांतर्गत रस्ते चिखलमय तात्काळ रस्ता दुरुस्त करा नसता अंदोलन करु*
तालुक्यातील मौजे चकलांबा येथील संत सावता चौक ते बस स्थानक हा रस्ता मोठा वर्दळीचा असून गेली ४० पेक्षा अधिक वर्षापासून या रस्त्यावर खडीकरण केले नाही. सदरच्या रस्त्याचे दुरुस्ती कामाला शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर मंजुरी मिळुन वर्षे उलटले मात्र अद्याप तरी रस्ता दुरुस्ती सुरु केली नाही.
संत सावता चौक ते बस स्थानक या वर्दळीच्या रस्त्यावर खड्डेच – खड्डे पडले असून पूर्णत: चिखलमय झाल्याने अनेक आपघात घडत असून अनेकजणांना गंभीर जखमा झाल्या तर वयोवृद्ध व्यक्तींचे कंबर मोडले वाहन धारकांसह पादचाऱ्यांना आपला जिव मुठीत धरुन तारेवरची कसरत करावी लागते.
संत सावता माळी चौक ते मारुती मंदीर
२०० ते २५० मिटरचा रस्ता पुर्नत: चिखलमय झाला असून याकडे ग्रामपंचायतसह जिल्हा परिषद सदस्य दू्र्लक्ष्य करत आहे, सदरील रस्ता हा सार्वजनीक बांधकाम विभागा अंतर्गत येत असल्याचे सांगत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी या संत सावता चौक ते बस स्थानक या रस्त्याचे पक्के सिमेंट किंवा डांबरीकरण तातडीने करावे नसता वंचित बहुजन आघाडी चकलांबा सर्कलच्यावतिने रेवन गायकवाड, श्रीकृष्ण खेडकर, सोमनाथ साळवे, अनिल साळवे यांच्यासह अंदोलन करणार असा ईशारा प्रसिद्धीपत्रका द्वारे दिला आहे.
सार्वजनीक बांधकाम विभागाचे जाणिवपूर्वक दू्र्लक्ष्य.
अनेकवेळा लेखी व तोंडी निवेदन दिल्यावरून सबंधित अधिकारी यांनी केवळ पहाणी करून अश्वासन देत भिजत घोंगडे ठेवत जाणिवपूर्वक दू्र्लक्ष्य करत असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त केला जात आहे.