१९ फेब्रुवारी शिवजयंती समिती अध्यक्षपदी सौ.नालकर,कार्याध्यक्षपदी सौ.लांबे तर उपाध्यक्ष सौ.पटारे*

*१९ फेब्रुवारी शिवजयंती समिती अध्यक्षपदी सौ.नालकर,कार्याध्यक्षपदी सौ.लांबे तर उपाध्यक्ष सौ.पटारे
राहुरी तालुका/अशोक मंडलिक
बुधवार दि.१२ जानेवारी रोजी राहुरी येथे महिलांनी कोरोना नियमांचे पालन करत राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सहात साजरी केली.या प्रसंगी वर्षा लांबे,ज्योती नालकर,राजश्री घाडगे,श्रद्धा धागुडे,दिपाली अडसुरे,शेजल ढेपे,अश्विनी कुमावत,पूनम शेंडे,अनिता शेंडे,भारती तनपुरे,अर्चना ढेपे,प्राजक्ता वाघ,अश्विनी पटारे आदी उपस्थित होत्या.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सौ.वर्षा लांबे म्हणाल्या की,आज आपण जिजाऊयांची ४२४ वी जयंती साजरी करत आहोत.शेकडो वर्षानंतर देखील जिजाऊ यांनी पेटवलेल्या क्रांतिकारक विचारांनी प्रेरित होवून आजची स्री पुरुषांच्या बरोबरीने राजकारण,समाजकारण,नोकरी,व्यवसायअशा प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत.प्रत्येक महिला भगिनीने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेवून या युगातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची युवापिढी घडवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे सौ.लांबे म्हणाल्या.
यावेळी सौ.अश्विनी कुमावत म्हणाल्या की, जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली. मुघलांच्या अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले.
राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत मराठा एकीकरण समितीच्या वतीने साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सव समिती २०२२ पदाधिकारी निवड चिठ्या टाकून करण्यात आली.यावेळी अध्यक्ष म्हणून ज्योती नालकर,उपाध्यक्षपदी अश्विनी पटारे,सचिव अर्चना ढेपे,खजिनदार पदी पूनम शेंडे,कार्याध्यक्ष पदी वर्षा लांबे यांची निवड करण्यात आली. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय झाला आहे.सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम न घेता केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.मिरवणुकी दरम्यान शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करत राहुरी शहरात पालखी फेरीचे आयोजन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी जिजाऊच्या लेकी ग्रुपच्या सौ.राजश्री घाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.