उदयन गडाख यांच्या वाढदिवसा निमित्त उसतोड कामगाराच्या मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटट.

उदयन गडाख यांच्या वाढदिवसा निमित्त उसतोड कामगाराच्या मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटट.
सोनई येथील मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष युवानेते उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त मुळा कारखाना ऊस तोड कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले गेले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूण मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य उदय पालवे व विनायक दरंदले यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुळा कारखाना गट ऑफिस वरील ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
उदयनदादा गडाख मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते मुळा कारखाना साईट वरील 150 मुलांच्या वर शालेय साहित्य व खाऊ वाटप केल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहेत. सोनई परिसरामध्ये सामाजिक उपक्रम राबवतात.
उदयन दादा मित्रपरिवार सदस्य सुमित जठार वैभव वाघमारे गणेश आढाव किरण निमसे जयदीप औटी मित्र परिवार या वेळी उपस्थित होते.
सोनई परिसरात या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे.