अमृतमहोत्सवानिमित्त व बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त बेलापूरात प्रथमच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून राष्टगीत लावण्यात आले

अमृतमहोत्सवानिमित्त व बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त बेलापूरात प्रथमच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून राष्टगीत लावण्यात आले
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त बेलापूरात प्रथमच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून राष्टगीत लावण्यात आले होते हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत सकाळी साडेआठ वाजता गावातील सर्व नागरीकांनी एकाच वेळेस ध्वज उभारले त्यानंतर सकाळी नऊ वाजता बेलापूरातील मुख्य पेठेतील जामा मस्जिद साईबाबा मंदिर, बिरोबा मंदिर श्री चक्रधर स्वामी मठ गावातील शालोम चर्च,ईनामदार मशिद,शिलोह चर्च आदि प्रार्थनास्थळ तसेच सर्व शाळामधील स्पिकरवरुन राष्ट्रगीत लावण्यात आले नागरीकांना अवाहन केल्याप्रमाणे सर्व नागरीक घरातून रस्त्यावर येवुन राष्ट्रगीताकरीता उभे राहीले बेलापूरातील आझाद मैदान येथे सर्व नागरीक जमा झाले त्या ठिकाणी सूचना दिल्याप्रमाणे बरोबर नऊ वाजता सर्वत्र राष्ट्रगीत सुरु झाले प्रत्येक नागरीक राष्ट्रगीताचा मान ठेवुन जागेवरच उभे राहीले राष्ट्र गीतानंतर वंदे मातरम़् भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाने अनेकांना आचंबित केले त्यानंतर मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले. बचत गटाच्या महिलांनी गावातून तिरंगा फेरी काढली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,सोसायटी पदाधिकारी व संचालक,विविध राजकीय पक्षांचे नेते व सदस्य,विविध संस्था व पतसंस्था यांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी,विविध मान्यवर, नागरिक आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.