छबु फुलमाळी यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड.

छबु फुलमाळी यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड.
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील तिरमल समाजातील छबु साहेबराव फुलमाळी यांची पोलीस उपनिरीक्षक पदीं निवड झाली आहे. तिरमल समाजांचा व्यवसाय म्हशी पाळणे हा व्यवसाय असताना यावा फाटा देत जिद्द मेहनतीच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छबु फुलमाळीने हे यश संपादन केले आहे घरी सर्व आडानी व समाजात कुणीही उच्च शिक्षित नसतांना आपले शिक्षण पूर्ण करुन.छबु फुलमाळी उपनिरीक्षक झाला असल्याने समाजला त्याचा अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया समाज बांधवांनी दिली. फुलमाळी यांचे दहावी पर्यंत शिक्षण श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे झाले तर बारावी न्यु आर्ट्स सायन्स काॅलेज शेवगाव व पदव्युत्तर शिक्षण कोकण कृषी विद्यापीठ दापोली तर पोस्ट ग्रॅज्युएट महात्मा फुलें कृषी विद्यापीठ राहुरी येथे पुर्ण केले. घरात दोन भाऊ तर छबुराव सर्वात लहान आई वडील भाऊ आपल्या पारंपारिक पद्धतीने काम लहान पणापासून कुस्तीची शोक वेळात वेळ काढून आपला छंद जोपासत कुस्ती नॅशनल पर्यत भाग घेऊन कुस्ती मध्ये नाव कमविले आहे. नासिक येथे एक वर्ष ट्रेनिंग करणार आहे. तिरमल समाजांचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला म्हणुन त्यांचा ठिक ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. सोनई येथे सोनई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संदिप कुसळकर व धनगरवाडीचे माजी सरपंच गुलाब पालवे यानी सोनई गावाच्या वतीने सत्कार केला. यावेळी पत्रकार अशोक भुसारी,गणेश ओहळ, मोहन शेगर दिलीप दादा शिंदे आदी उपस्थित होते.