नोकरी

कायद्याला न मानणारे व कायदा हातात घेऊपाहात असेल त्याची गय केली जाणार नाही… शिवपुजे पोलीस उपअधीक्षक 

कायद्याला न मानणारे व कायदा हातात घेऊपाहात असेल त्याची गय केली जाणार नाही… शिवपुजे पोलीस उपअधीक्षक 

 

टाकळीभान प्रतिनिधी: आम्ही कायद्याचा सन्मान करतो प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे, जर कुणी कायदा माणित नसेल व कायदा हातात घेऊ पाहत असेल, त्याची गय केली जाणार नाही, अशे प्रतिपादन टाकळीभान येथील शांतता कमिटी बैठकी प्रसंगी श्रीरामपूर पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांनी केले. टाकळीभान येथे आगामी होणारे सण उत्सव व सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सर्व ग्रामस्थांची शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी प्रसंगी श्रीरामपूर पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे पो. निरीक्षक दशरथ चौधरी, एपीआय अतुल बोरसे होते. तसेच गावातील पदाधिकारी माजी सभापती नानासाहेब पवार,माजी सरपंच मंजाबापू थोरात, राजेंद्र कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, भाजपच्या जिल्हा महिला आघाडीचे सरचिटणीस सुप्रियाताई धुमाळ, मा. चेअरमन राहुल पटारे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे , राधाकृष्ण वाघुले, डॉ. श्रीकांत भालेराव,आबासाहेब रणनवरे, आदी प्रमुख उपस्थितहोते.

     या वेळी तीनही प्रमुख अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शिवपुजे म्हणाले की ग्रामस्थांनी आतापर्यंत असाच एकोपा कायम ठेवून गावाचा लैकिक टिकवावा. सर्व सण उत्सव एकोप्याने व आनंदाने साजरे करावेत. शालेय मुलांना अठरा वर्षापर्यंत मोबाईलचा वापर टाळावा व त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. शालेय विद्यार्थ्यांना सोशल मीडिया, गुड टच, बॅड टच, इतर ही काही विषयांची जागृती करणे गरजेचे असून त्यानुसार तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्रबोधन करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच निर्भया पथक आपण सुरू करत असून शाळा, महाविद्यालय या ठिकाणी हे पथक फिरवून या माध्यमातून मुलींची छेडछाड व टवाळखोरांवर जागेवर कारवाई करणे शक्य होणार आहे. चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा अतिशय प्रभावी असून तिचाही गावाने उपयोग करावा व ती सुरू ठेवण्यासाठी त्याचा नियमित वापर करावा त्यासाठी त्या यंत्रणेवर सतत कॉल सुरू ठेवणे गरजेचे आहे. तसेच ग्रामपंचायत मेन चौकामध्ये तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास पुढाकार घ्यावा. व्यापाऱ्यांनीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवने गरजेचे असून त्यामुळे आपल्याला तपासाला मदत होते व आपल्या व्यवसायाला संरक्षण मिळते. अवैध धंदे यांना पूर्णपणे विरोध करणार असून त्यास थारा देणार नसल्याचे ते म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक चौधरी म्हणाले की गावाने सर्व छोटे-मोठे सण उत्सव अतिशय शांततेने उत्साहाने साजरे केले आहेत. व तसेच गावाचे गाव पण सर्वांनी अबाधित ठेवावे असे ते म्हणाले. यावेळी नानासाहेब पवार म्हणाले की वारंवार गुन्हे करणाऱ्यांची पोलीस प्रशासनाने गय करू नये, जे समाजाला त्रासदायक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी.

   याप्रसंगी राजेंद्र कोकणे, नारायण काळे, देशमुख भाई आदींनीही मनोगत व्यक्त केले. बैठकी प्रसंगी अनिस मौलाना, ग्राम. सदस्य भाऊसाहेब पटारे, सुनील बोडखे, गणेश पवार, मोहन रणनवरे, भैया पठाण, शिवाजीराव धुमाळ,सुधीर मगर,अतुल गवांदे, प्रकाश धुमाळ, रघुनाथ शिंदे,अमोल पटारे, विलास सपकळ,अक्षय कोकणे, रामेश्वर शिंदे, योगेश नवघणे, शरद कापसे, मधुकर गायकवाड ,शरद रणनवरे, आप्पासाहेब रणनवरे, बंडू नागले, एकनाथ रणनवरे,जॉन रणनवरे , संतोष रणनवरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितीबद्दल ग्रामस्थांचे आभार प्रा. जयकर मगर यांनी मानले.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे