तालुक्याच्या विकासासाठी ९०० कोटी रुपयांचा निधी-आमदार लहु कानडे

तालुक्याच्या विकासासाठी ९०० कोटी रुपयांचा निधी-आमदार लहु कानडे
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आत्तापर्यंत जवळपास ९०० कोटी रुपयांचा निधी आपण आणला असुन त्यात बेलापुर गावाला १६० कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. या निधीतून होणारी विकासकामे ही दर्जेदार होण्यासाठी नागरीकांनी दक्ष रहावे, असे अवाहन आमदार लहु कानडे यांनी केले.
बेलापूर येथील इंद्रबिल्वेश्वर मंदीरात लोकसंवाद कार्यक्रमात आ. कानडे बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड अध्यक्षस्थानी होते. यावेळी जि. प. सदस्य शरद नवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रणजीत श्रीगोड, रविंद्र खटोड, कनजी टाक, प्रवीण काळे, गोविंदराम दायमा, कांतीलाल मुथा व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. कानडे पुढे म्हणाले की विकास कामांना निधी हा एकदाच मिळतो. त्यामुळे होणारी कामे ही दर्जेदारच झाली पाहीजे. त्याकरीता सर्वानीच जागृत असले पाहीजे. या तालुक्यात काहींची मक्तेदारी होती. काही ठेकेदारांची, दलालांची मनमर्जी चालत होती. रस्त्याच्या कामात तीन थर असतात हे श्रीरामपुरकरांना समजले आहे. श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असुन या रस्त्यावर रात्रीही लख्ख प्रकाश असेल, अशी व्यवस्था आमदार निधीतून केलेली आहे. तालुक्यातील एक हजार नागरीकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवुन दिला. बेलापुरला मोठी पाणी पुरवठा योजना होत आहे. सर्व शासकीय योजना पुढारी व ठेकेदार यांच्याकरीता न रहाता सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळाला पाहीजे., असे ते म्हणाले.
तालुक्यात विकासकामे जोरात सुरु होती. सरकार बदलल्याने काही अडचणी आल्या. असे असले तरी जनतेने मला विकास कामे करण्यासाठी निवडून दिले, याचा विसर पडू देणार नाही. आज तालुक्यातील ९५ % प्रमुख रस्त्याची कामे झाली आहेत. गावोगाव व्यायामशाळा दिल्या. सर्व शाळा डिजीटल केल्या. शाळांना संगणक दिले. भविष्यात या भागातील पाणी प्रश्नदेखील गंभीर होणार आहे. त्याकरीता स्वतंत्र लढा उभारावा लागणार आहे. जनतेच्या कल्याणाच्या नावाखाली स्वतःचे कल्याण करणारी पिढी तयार होत आहे. याकरीता नागरीकांनी सावध व्हावे, असेही आ. कानडे म्हणाले.
प्रारंभी इंद्रबिल्वेश्वर मंदीराच्या वीस लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमीपुजन आ. कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक. रणजीत श्रीगोड आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेश खटोड, कैलास चायल, विजय कटारीया, अनिल नाईक, प्रकाश कुर्हे, रफीक शेख, सुभाष बोरा, रमेश अमोलीक, अक्षय नाईक, किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, राजेंद्र लखोटिया, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक, शिवाजी पा. वाबळे, वसंतराव शिंदे, भास्करराव कोळसे, सुरेश अमोलिक, केदार दायमा, सुरेश जाधव, दीपक सिकची, दत्तात्रय कुमावत, सूर्यभान नागले, संजय रासकर, गौरव सिकची, मधुकर ठोंबरे, किशोर खरोटे, चंद्रकांत नाईक, रमेश कुमावत, वसंतराव म्हसे, महेश खंडागळे, दीपक निंबाळकर, सुधाकर खंडागळे, केदारनाथ मंत्री, राजेश राठी, पत्रकार देविदास देसाई, ज्ञानेश गवले, सुहास शेलार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि कोळपकर यांनी केले. अँड. विजयराव सांळूंके यांनी सूत्रसंचलन केले.