हरदिन मॉर्निंग तर्फे स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मान

हरदिन मॉर्निंग तर्फे स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मान
अहमदनगर – सामाजिक, शैक्षणिक तसेच अनाथ, दिव्यांग, निराधार, गरीब विद्यार्थी यांच्यासाठी स्नेहबंध चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी काम केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अभिनेत्री आदिती गोवित्रीकर यांच्या हस्ते डॉक्टरेट देण्यात आली. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कच्या रौप्य महोत्सवानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुप च्या वतीने झालेल्या कार्यक्रमात डॉ. शिंदे यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी छावणी परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, कॅन्टोन्मेंटचे माजी सदस्य सुरेश मेहतानी, उद्योजक लॉरेन्स स्वामी, महेश पथसंस्थेचे संस्थापक मन्नूशेठ झंवर, एकनाथ जगताप आदी उपस्थित होते.
डॉ. शिंदे यांना मानद डॉक्टरेट २०२३, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, प्रौड ऑफ पार्लमेंट अवॉर्ड, अहमदनगर भूषण पुरस्कार मिळाले आहेत.