श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न

श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव शाळेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न
श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव शाळेतील पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवार (दि.25) रोजी सकाळी शालेय गणवेश व दप्तर वाटप करण्यात आला.
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर वर्षी शाळेतुन विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय गणवेश वाटप करण्यात येते. या ही वर्षी शाळेतील पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच रामेश्वर जगताप हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीनिवासन देवकते, शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले, अभिमन्यू ठोंबरे, संभाजी माकणे, राहुल सवासे आदींची उपस्थिती होती. यावेळी या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समोर करताना रामेश्वर जगताप म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना शाळेतील शिक्षकांकडून मिळणारे न्याय आत्मसात करावे. शाळेतील ज्ञान हे भविष्य येणाऱ्या कार्यास कामाला येते. विद्यार्थीच्या अंगी नेहमी नम्रता व सुजन शिलता असावे असे त्यांनी सांगून या वर्षी दहावी वर्गात जो विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळवेल त्यांना सरपंच या नात्याने प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येईल असे घोषित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले यांनी केले. तर सुत्रसंचलन मयुर येवलेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती मुक्ताबाई मोटे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत सोळुंके, अंजली माने, नवनाथ घुगे, योगेश म्हैसनवाड, प्रसाद कुलकर्णी, शिवाजी पवार, गोरख साकळे, बाबासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर बास्टे आदी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.