खेवरे ना आमदार नव्हे तर नामदार झालेले पाहिचे आहे– संपर्क प्रमुख आमदार. सुनिल शिंदे

खेवरे ना आमदार नव्हे तर नामदार झालेले पाहिचे आहे– संपर्क प्रमुख आमदार. सुनिल शिंदे
शिवसेना जिल्हाप्रमुख पैलवान रावसाहेब खेवरे यांचे संघटनात्मक कार्य अनमोल आहे शिवसेनेत निष्ठेला महत्त्व आहे त्यामुळे खेवरे यांना केवळ आमदार नव्हे तर नामदार बनवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू व त्यांच्या रूपाने या परिसराला आणखी न्याय कसा देता येईल याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क नेते आमदार सुनील शिंदे यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवसंपर्क अभियान 2022 टप्पा क्रमांक 2 अंतर्गत राहुरी तालुका शिवसैनिकांचा मेळावा तालुक्यातील येथे शिवसेनेचे संपर्क नेते आमदार सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख पैलवान रावसाहेब खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे हरिभाऊ शेळके रफिक शेख मच्छिंद्र म्हस्के अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ राहुरी तालुका प्रमुख विजय ढोकणे गणेश जाधव प्रमोद मंडलिक आदींची उपस्थिती मध्ये पार पडला.
यावेळी बोलताना आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले की शिवसेनेमध्ये निष्ठेला नेहमी महत्त्व राहिले आहे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा होती महाराष्ट्र मध्ये सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी शिवसैनिकाच्या माध्यमातून केला शिवसेना मोठी करण्यासाठी त्यांनी ज्यांना परस्र्श केला असे अनेक जण सामान्य कुटुंबात मधून नेते होऊन मंत्री पदापर्यंत गेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पैलवान रावसाहेब खेवरे हे देखील शिवसेनेसाठी व संघटनात्मक कार्यासाठी मोठे योगदान देत आहेत व शिवसेना मजबूत करण्यासाठी अपार कष्ट घेत आहेत त्यांना शिवसेना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही केवळ आमदार नव्हे तर नामदार पदापर्यंत खेवरे यांना पोचवण्याचे स्वप्न आम्ही पूर्णत्वास नेण्यास प्रयत्न करू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी हे अभियान सुरु केले व त्यातून सामान्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची बांधिलकी समाजाशी आहे महाराष्ट्र आणखी पुढे नेण्यासाठी उद्धव साहेब ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख पहिलवान रावसाहेब खेवरे यांनी सांगितले की, गेली चार दिवसांपासून शिवसंपर्क अभियान नगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेले हे अभियान सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी आहे शिवसेना हा सामान्यांचा पक्ष आहे दगडाला देव करण्याची ताकत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यामध्ये होती कैलास वासी अनिल भैया राठोड बबनराव घोलप यांच्यासारख्या सामान्य जनातील माणसांना शिवसेनेने पाच वेळा आमदार करून नामदार देखील बनवले आहे मी गेली पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये निष्ठेने काम करत असल्याने सर्व वरिष्ठ नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे व त्यांच्या माध्यमातून माझे आमदार होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. देसवंडी सारख्या छोट्या गावांमध्ये सर्व गट तट एकत्र आणणे मध्ये मला यश आले व या गावाने केलेल्या प्रेमामुळे गावचा विकास हा ध्यास मी हाती घेतला आहे व त्या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न सुरू आहेत माझे एक कुटुंब असताना देखील गावचा सरपंच व सोसायटीची चेअरमन माझ्या कुटुंबातील आहे त्यावरून या गावातील लोकांचे माझ्यावर प्रेम दिसून येते.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन म्हसे देसवंडी सोसायटीच्या चेअरमन सुनिताताई खेवरे देसवंडी चे सरपंच गणेश खेवरे दत्तात्रेय पवार सुभाष पवार नामदेव कोकाटे भाऊसाहेब कोकाटे विठ्ठल कोळसे रमेश कोकाटे बाळासाहेब गाडे दीपक पंडित राहुल चोथे कैलास शेळके बाबासाहेब मुसमाडे हमीद पटेल पोपट शिरसाठ डॉक्टर किशोर शिरसाठ अर्जुन कोकाटे दत्तात्रेय इंगोले भाऊसाहेब खेवरे युवा नेते ओंकार खेवरे अशोक शिरसाठ अण्णासाहेब माने राजेंद्र शिरसाट सुभाष पवार बापू गीते उत्तम पवार रमेश पवार रमेश खुळे शिवाजी जाधव सुनील शेलार भानुदास तमनर विजय शिरसाठ सतिष माने सचिन कल्हापुरे मंदाकिनी कल्हापुरे कमल कल्हापूरे आशाबाई खेवरे सत्यभामा शिरसाठ आदींसह शिवसैनिक नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.