धार्मिक
*श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळा प्रमुखपदी योगी निरंजन नाथ यांची निवड*

*श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळा प्रमुखपदी योगी निरंजन नाथ यांची निवड*
दिनांक 29 मार्च 2024 रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त मंडळाची मासिक बैठक आळंदी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सन 2024च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी
पालखी सोहळा प्रमुख म्हणून संस्थान चे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी ऍड राजेंद्र बा. उमाप, प्रमुख विश्वस्त, डॉ. भावार्थ रा. देखणे, विश्वस्त आणि योगी निरंजन नाथ विश्वस्त उपस्थित होते