वसंत चितळकर यांचा संशोधन लेख ग्लोबल पब्लिकेशन मध्ये प्रकाशित

वसंत चितळकर यांचा संशोधन लेख ग्लोबल पब्लिकेशन मध्ये प्रकाशित
टाकळीभान प्रतिनिधी – ग्राहकांसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी व शेतकऱ्यांना गुरामध्ये प्रतिजैविक वापरण्याच्या पद्धतीबाबत वसंत चितळकर यांचा संशोधन लेख ” ग्लोबल पब्लिकेशन ” मध्ये प्रकाशित,
विविध रोगांवर गुरांवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करणे हे संशोधनाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे कारण त्याचा अन्न सुरक्षा, प्राणी कल्याण आणि प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता, विशेषत: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित आहे. दुधासारख्या गुरांच्या उत्पादनांमध्ये प्रतिजैविकांचे अवशेष मानवी आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकतात, ज्यामध्ये प्रतिजैविक-प्रतिरोधक जीवाणूंचा विकास आणि संभाव्य एलर्जीक प्रतिक्रियांचा समावेश होतो. म्हणून, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रकाशनांमध्ये संशोधन लेख प्रकाशित केल्याने महत्त्वाचे निष्कर्ष प्रसारित करण्यात मदत होते आणि ग्राहकांसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी धोरणकर्ते, पशुवैद्यक आणि शेतकऱ्यांना गुरांमध्ये प्रतिजैविक वापरण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहिती दिली जाते.
वसंत चितळकर हे टाकळीभान येथील असून सध्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदस्थ म्हणून ” संशोधन व विकास ” विभागात काम करतात. टाकलीभान सारख्या ग्रामीण भागातुन माध्यमिक शिक्षण घेऊन ” अन्न तंत्रज्ञान शाखेत ” मध्ये उच्च शिक्षण प्राप्त केलेले आहे.अतिशय सामान्य गरीब कुटुंबात जन्म घेऊन संघर्ष करून शिक्षण घेतलेल्या पुत्राची ” संशोधन लेखाची “नोंद जागतिक स्थरावरील ” ग्लोबल पब्लिकेशन ” घ्यावी ही एक अभिमानस्पद बाब आहे. श्री.वसंत चितळकर हे तलाठी श्री.अशोक चितळकर भाऊसाहेब यांचे लहान बंधू आहेत.