श्रीरामपूर बाजार समितीला प्रशासकीय काळात विक्रमी ८२ लाख रुपये नफा
श्रीरामपूर बाजार समितीला प्रशासकीय काळात विक्रमी ८२ लाख रुपये नफा
सन २०२२-२३ आर्थिक वर्षात ३ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न
टाकळीभान-प्रतिनिधी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सन २०२२/२३ या वर्षात प्रशासकीय कामकाजात विक्रमी ८२ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती श्रीरामपूर बाजार समितीचे प्रशासक दीपक नागरगोजे यांनी दिली आहे.
श्रीरामपूर बाजार समितीवर ७ ऑक्टोबर २०२२ रोजी राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा बाजार समितीकडे ४५ लाख रुपये मुदत होती. ती मुदत ठेव आता १ कोटी ६५ लाख रुपये पर्यंत पोहोचली आहे. त्यांनतर प्रशासक दीपक नागरगोजे व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी प्रशासकीय ८ महिने कालावधीत बाजार समितीच्या कारभारावर बारकाईने लक्ष देत उत्पन्न वाढीसाठी तसेच शेतकरी,व्यापारी,मापाडी व हमाल यांनाही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला या कालावधीमध्ये ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रशासक दीपक नागरगोजे व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी १४ कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला तसेच सदर वर्षात निवृत्त कर्मचाऱ्यांची शिल्लक देणे रक्कम २४ लाख रुपये अदा करण्यात आले तसेच बाजार समितीमध्ये स्वच्छतेवर लक्ष ठेवून श्रीरामपूर नगरपालिका सर्कलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला तसेच पेट्रोल पंपाकडे योग्य व्यवस्थापन करून ग्राहकांना योग्य सुविधा पुरविण्याकडे तसेच शुद्ध पेट्रोल व डिझेल देण्याकडे भर दिला त्यामुळे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या शिर्डी सर्कलमध्ये सन २०२२/२३ या संपूर्ण वर्षात पेट्रोल सेलमध्ये श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल कंपनी प्रथम क्रमांक मिळविला सदर वर्षात पेट्रोल डिझेल विक्रमी ३४ लाख ४३ हजार लिटर विक्री केली तसेच बेलापूर उपबाजार आवारातील दुकान गाळे व गोदाम इमारतीचे अनेक महिन्यांपासून रखडलेले बंद काम पूर्णत्वास आणलेले आहे त्यासाठी बाजार समितीच्या स्वनिधीतून १ कोटी ९० लाख रुपये गुंतविण्यात आले तसेच टाकळीभान उपबाजार आवारात मोकळा कांदा मार्केट सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच मुख्य मार्केट यार्ड मध्ये देखील मोकळा कांदा मार्केट, गोणी कांदा मार्केट, भाजीपाला मार्केट सुस्थितीत योग्य व्यवस्थापन करून चालू ठेवलेले आहे सदर कामाची दखल घेऊन नाशिक विभागाचे सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विलास गावडे यांनी स्वतः श्रीरामपूर बाजार समितीस नुकतीच भेट देऊन प्रशासक दीपक नागरगोजे व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्या कामाचे कौतुक केले.