बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणार्यांवर कारवाई करावी मागणी.

बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणार्यांवर कारवाई करावी मागणी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील टेलटँक परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरूम वाहतूक सुरू असून या
बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विश्वनाथ राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, टाकळीभान टेलटँक परिसरातून पोकलॅण्ड व जे.सी.बी.च्या साह्याने दिवसा उत्खनन करून मोठ्या स्वरुपात मुरमाची चोरी करण्यात येत असून अवजड वाहनांच्या साह्याने बेकायदेशीरपणे मुरूम वाहतुक चालू आहे. या अवजड वाहनाच्या मुरूम वाहतूकीमुळे अधीच दयनिय अवस्था झालेल्या टाकळीभान कारेगाव रस्त्याची वाट लागली आहे तसेच या वाहनामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ उडत असल्याने पिकांचे व फळबागांचे धुळ व माती मुळे नुकसान होत आहे व रस्त्याची अतिशय दुरावस्ता झालेली आहे. मुरुम वाहतूक करणारे वाहन चालक हे दारुच्या नशेत अतीशय जोरात वाहन चालवित असल्याने रस्त्याने ये-जा करणार्या नागरीकांना व शाळकरी मुलांना रस्त्याने चालने मुश्किल झालेले असून या भरधाव वाहनामुळे जीवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी या बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी विश्वनाथ वाघुले व या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी श्रीरामपूर, तहसीलदार श्रीरामपूर, मंडलाधिकारी, टाकळीभान यांना देण्यात आल्या आहेत.