काम करणाराला श्रीरामपूरकर डोक्यावर घेतात हे मी अनुभवले – प्रशांत पाटील

काम करणाराला श्रीरामपूरकर डोक्यावर घेतात हे मी अनुभवले – प्रशांत पाटील
आई वडीलांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याची अंगी असलेली महत्वकांक्षा यामुळेच सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने व श्रीरामपुर करांच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असुन आपण दिलेले प्रेम स्नेह कधीच विसरु शकणार नाही असे मत श्रीरामपूर येथून बदली झालेले तहसिलदार प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथुन नुकतीच बदली झालेले तहसिलदार प्रशांत पाटील यांचा अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व श्रीरामपुर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने आयोजीत निरोप अर्थात सन्मान सोहळ्यास उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई हे होते. यावेळी नायब तहसिलदार ज्योती गुंजाळ, अव्वल कारकुन सुहास पुजारी, क्लर्क मिलींद नवगिरे, माऊली वृद्धाश्रमाचे संचालक सुभाषराव वाघुंडे, संघटनेचे जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, सुर्योदय पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप गायके, पत्रकार लालमहमद जहागीरदार, भाऊसाहेब वाघमारे, गोपीनाथ शिंदे, सुभाष चोरडीया, प्रकाश गदीया आदि प्रमुख उपस्थीत होते.
तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की संविधानाने दिलेल्या शक्तीचा वापर सर्वसामान्यासाठी करायचा असतो. चांगल्या कुटूंबात जन्माला आलो तर चांगलं करायला काय हरकत आहे हे लक्षात ठेवून काम करत राहायचे असते. निष्कलंक व्यक्तीमत्व असलेले शिक्षक वडीलांनी कडक शिस्तीने केलेल्या संस्कारातून हे सर्व शक्य होत आहे. अचानक येणाऱ्या संकट काळास अनेक लोक संधी समजतात अन् हात धुवून घेतात परंतु तालुक्यातील सर्व दुकानदारांनी मग तो स्वस्त धान्य दुकानदार असो किराणा दुकानदार असो सर्वांनी कोरोना काळात प्रशासनाला सहकार्यच केले त्यामुळेच आपण यशस्वीपणे कोरोनावर मात करु शकलो पुरवठा विभागाने व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी चांगले काम केले.सर्वांच्या सहकार्यामुळेच आदर्श तहसीलदार होण्याचा बहुमान मिळाला असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगीतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, पत्रकार लालमहमद जहागीरदार, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, माऊली वृद्धाश्रमाचे सुभाषराव वाघुंडे, भाऊसाहेब वाघमारे आदिंनी तहसिलदार प्रशांत पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यात सव्वाचार वर्षात केल्या कामांचा संदर्भ देत आपले अनुभव सांगत कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व, कुशल प्रशासक, उत्तम मार्गदर्शक व सकारात्मक विचारांचा ठेवा असलेले व्यक्तीमत्व म्हणजेच तहसिलदार प्रशांत पाटील हे असल्याचे अनेकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.तहसीलदार पाटील यांच्याविषयी अनुभव सांगताना प्रत्येक जण भावूक होत होता यावेळी काही काळ स्वत: तहसिलदार पाटील हे ही मनोगतं व्यक्त करताना भावूक झाले होते.
यावेळी देवराम गाडे, बाळासाहेब राठोड, मुरलीधर वधवाणी, राजन वधवाणी, वनराज ढाले, योगेश नागले, राजेंद्र वाघ, गणेश चव्हाण, उमेश दरंदले, अजीज शेख, प्रेम छतवाणी, विकी काळे, सुकदेव वाघमारे, आप्पा शिरोळे, सद्दाम शेख, नुरूद्दीन शेख आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत झुरंगे यांनी केले, प्रास्ताविक राजन वधवाणी यांनी केले तर आभार रज्जाक पठाण यांनी मानले.