राज्यात खळबळजनक घडामोडीअशक्यही शक्य करतील स्वामी’ पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा

राज्यात खळबळजनक घडामोडीअशक्यही शक्य करतील स्वामी’ पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा
राज्यातील खळबळजनक राजकीय घडामोडी सुरु आहेत. राज्यातील राजकारणात मोठ्या घटना व त्यावरील क्रिया प्रतिक्रियांनी वातावरण ढवळून टाकले आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे.या ट्विट मध्ये ‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ असे कॅप्शन देत ट्विट करण्यात आले आहे.
शरद पवार काय म्हणाले?
या सर्व घटनाक्रमावर शरद पवार यांनी सुचक विधाने केली आहेत.जे तुमच्या मनात आहे ते आमच्या मनात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी एकाच विचाराचे आहेत.पक्षाची कोणतीही बैठक कोणीही बोलावली नाही, मी स्वतः थोड्याच वेळात दिल्लीला जाणार आहे. कोण काय म्हणत यापेक्षा राष्ट्रवादी बाबत मी काय म्हणतो ते महत्त्वाचे आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान धनंजय मुंडे अजित पवारांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. परंतु धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलणे टाळले. माध्यम प्रतिनिधींना धन्यवाद, थँक यू म्हणत मुंडे मार्गस्थ झाले.
अजित पवारांची राष्ट्रवादीकडूनच कोंडी?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अस्वस्थतेला पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेच एकटे जबाबदार असल्याचे चित्र जाणीवपूर्वक तयार केले जात असून त्यांच्या संदर्भातील छोट्या छोट्या गोष्टींनाही अवास्तव प्रसिद्धी दिली जात असल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणताही मोठा नेता यामध्ये तोंड उघडण्यास तयार नसून हे वातावरण निवळण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नसल्याने अजित पवार यांना टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडण्याचीच ही खेळी असल्याचीही चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.