सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संपावर , अंगणवाडी बंद असल्याने पालक वर्ग चिंतेत,

सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संपावर , अंगणवाडी बंद असल्याने पालक वर्ग चिंतेत,
संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस अंगणवाडी बंद ठेवून दे मुदत संप सुरू केला आहे , आपल्या लाभार्थ्यांना आपल्या न्याय व कायदेशीर मागण्यांची माहिती द्यायची आहे. शासन पोषण आहारावर पण खूप कमी खर्च करीत आहे.
आपण अनेकदा कृती समितीच्या माध्यमातून तसेच आयटक म्हणून शासनाकडे आपल्या न्याय्य व कायदेशीर मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने पाठपुरावा केला. पण शासनाने तोंडी आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. शासनाच्या नाकर्तेपणामुळे तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे संप करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. शासन वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून आपल्यावर दडपण आणायचा प्रयत्न करेल. पोषण ट्रॅकर अॅप बाबत आधिकाऱ्यांनी प्रचंड दडपण आणायचा प्रयत्न केला. त्याला काही जणी बळी पडल्या. त्यामुळे यावेळी आधिकाऱ्यांची हिम्मत वाढली आहे. त्यामुळे या संपाच्या वेळी आपल्याला कणखरपणे व ठामपणे संपात एकजूट दाखवायची आहे. दोन डगरींवर पाय ठेवणे धोक्याचे ठरेल. संपात घरी बसून चालणार नाही तर रस्त्यावरील लढाई लढली पाहिजे. शासन व त्यांचे आधिकारी हुकूमशाही पद्धतीने सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घ्यायलाही तयार नाही.
काही कुत्र्याच्या छत्रीसारख्या संप काळात उगवणाऱ्या संघटना या संपफोडीसाठीच तयार करण्यात येतात याची जाणिव ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. पोषण ट्रॅकरच्यावेळी वरिष्ठांच्या सांगण्यावरून अनेक सुपरवायझर्स खोटे बोलायला, आपसांत संभ्रम निर्माण करायला तरबेज झाल्या आहेत. त्यांचे डाव वेळीच ओळखायला शिका.
सध्याचे सरकार हे पूर्णपणे कामगार कर्मचारी विरोधी आहे. साम दाम दंडाचा वापर करू शकते याची जाणीव ठेवा. हया संपात एकजूट टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या संपाप्रमाणे संपाला सहज घेवू नका. तुमचा संप काळात सक्रिय कृतीशील सहभाग आवश्यक आहे. निष्क्रिय व कॅज्युअल सहभाग सर्वांचे नुकसान करणारा ठरू शकेल.
लडेंगे और जितेंगे! एकजूट व संघर्ष हाच आपला नारा!
या संपत टाकळीभान येथील अंगणवाडी सेविका मदतनीस संगीता जोशी, अर्चना मावळे, मंगल जाधव, तीलोतमा शिंदे, मीरा गावंडे ,रेखा कणसे, मीरा जाधव छाया लांडगे अरुणा पाबळे मंदा गांगुर्डे अनिता लोखंडे ,अनिता गुंजाळ आलका सिद्धेश्वर ,आशा तगरे, सुरेखा माने, अनिता शिंदे, सगुना कोकणे, कल्पना कोकणे, रतनबाई आहेर, सुनिता शिरसाट ,कविता कांबळे, आदींनी सहभाग घेऊन अंगणवाडी बंद ठेवून बेमूदत संपत सामील