एक गाव एक शिवजयंती उत्सव जल्लोषात*

*आळंदी एक गाव एक शिवजयंती उत्सव जल्लोषात*
*फटाक्यांची आतिषबाजी आणि जय शिवाजी जय भवानी परिसर दुमदुमला*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोस्तव उस्ताह शिगेला पोहोचलेला दिसला, आळंदीत एक गाव एक शिवजयंती चे आयोजन आळंदीकर समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते, याबाबत आयोजन आढावा मीटिंग आळंदी पोलीस स्टेशन तसेच हजेरी मारुती मंदिरात आळंदीकर समस्त ग्रामस्थांनी घेतली, छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करताना एक वेगळ्या प्रकारची मिरवणूक आळंदीत पहावयास मिळाली, चौका चौकामध्ये ,विविध छटांच्या रांगोळी ने स्वागत, शोभेच्या आकर्षक फटाक्यांची आतषबाजी,वारकरी विद्यार्थी, ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी, महिला वर्ग ,आळंदीकर ग्रामस्थ ढोल लेझीम पथक,अश्वारूढ शिवछत्रपतींची वेशभूषा केलेली बालक, शिवकन्यांच्या रूपातील बालिका यांची अश्वारूढ मिरवणूक,डोळ्यांचे पारणे फेडत होते,त्याचबरोबर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा मिरवणुकीसाठी आणण्यात आला होता, विविध प्रकारची आकर्षक विद्युत रोषनाई ने छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मोहक वाटत होता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सहआयुक्त प्रेरणा कट्टे यांनी भैरवनाथ चौकात मिरवणूक आल्यानंतर, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले, यावेळी शांतता कमिटीचे सदस्य डीडी भोसले व प्रकाश कुऱ्हाडे, आळंदी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले व प्रशांत कुऱ्हाडे ,उत्तमराव गोगावले, आनंदा मुंगसे,मंगेश तायडे,किरण येळवंडे, नगरसेवक सागर बोरुंदिया,सचिन पाचुंदे,गोविंदा कुऱ्हाडे, पत्रकार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे,अजित वडगावकर प्रीतम किरवे, आशिष गोगावले,बालाजी शिंदे, ॲड,नाजीम शेख, ॲड आकाश जोशी, भागवत काटकर, शशी जाधव, संतोष भोसले, चारुदत्त प्रसादे,संकेत वाघमारे,वारकरी, महिला, ग्रामस्थ,युवक,तमाम शिवभक्त यांचा छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा जल्लोष जय घोष आसमानात दुमदुमत होता, ही भव्य मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी आढावा बैठकीत मार्गदर्शन केल्याप्रमाणे शांततेत उत्सव पार पडला, छत्रपती शिवरायांना अबाल,वृद्ध, अभिवादन करत असताना अंगावर शहारे आणणाऱ्या, जय शिवाजी जय भवानी , ने शिवभक्त मनोमन तृप्त होताना दिसले,