छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातुन सुसज्ज अशा रथामधुन मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातुन सुसज्ज अशा रथामधुन मिरवणूक काढण्यात आली गेवराई
शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती गेवराई शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.गेवराई मध्ये सकाळपासूनच शिवजन्मोत्सवाचा उत्सव पहायला मिळाला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातुन सुसज्ज अशा रथामधुन मिरवणूक काढण्यात आली यावेळी विविध कला व संस्कृती कार्यक्रम सादर करण्यात आले व शिवाजी महाराज व जिजाऊ,मावळा आदीवेशभूषा परिधान करण्यात आली होती.यावेळी समाजाच्या सर्व स्तरातुन शिवरायांना मानवंदना देण्यात आली तर प्रतिमेचे ही पुजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
शिवजन्मोत्सवा निमित्त रक्तदान , वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले.या अभुतपुर्व शिवजयंती उत्सवास गेवराई न्यायालयाचे माननिय न्यायाधीश उपस्थित होते.गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर,
शिवसेनेचे युध्दाजित पंडित, रोहीत पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस चे विजयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित भाजपाचे राजेंद्र भंडारी.विठ्ठल मोटे मनसे चे राजेंद्र भैया मोटे यांच्या सह विद्यार्थी, पत्रकार, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.शिवजयंती उत्सवादरम्यान पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे, शिवाजी भुतेकर यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.