माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृती साठी आळंदी नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम!

**माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृती साठी आळंदी नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम!
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी नगरपरिषदेमार्फत शिक्षक वृंदांसाठी “वसुंधरा प्रश्नमंजुषेच” आयोजन करत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे,
पर्यावरण समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जल,पृथ्वी,आकाश,अग्नी,वायू या पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा 3.0 या अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी आळंदी नगरपरिषदे मार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आळंदी शहरातील नगरपरिषदेच्या सर्व शाळांमध्ये पर्यावरण संवर्धना बाबत जनजागृती व्हावी यासाठी नगरपरिषदेमार्फत शिक्षकांसाठी “वसुंधरा प्रश्न मंजुषा” स्पर्धा घेतल्याची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली.
लहान मुलं, मुली हे उद्याच्या नवीन पिढीचे शिलेदार व *देशाचं भविष्य आहेत ही बाब ओळखून त्यांना वृक्षारोपणाचे महत्व, वसुंधरेचे जतन, हवा,जल, वायू प्रदूषण,पर्यावरणीय ऱ्हास, जलसंधारण, विविध पर्यावरणीय परिषदा या गोष्टींबाबत माहिती मिळावी व त्याच्यात जबाबदारी ची भावना निर्माण व्हावी याकरिता प्रथम सर्व शिक्षकांना पर्यावरण या विषयात रुची निर्माण करणे व त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे या उद्देशातुन आळंदी नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद शाळा क्र. १ या शाळेतील शिक्षकांची पर्यावरणावर आधारित २० प्रश्नांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेतली गेली.
शिक्षकांना पर्यावरण या विषयात विशेष रुची निर्माण व्हावी आणि सामान्य ज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यास प्रोत्साहित केले जावे या उद्देशाने सदर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत ३५ शिक्षकांनी सहभाग नोंदविला.सदरची वसुंधरा प्रश्न मंजुषा स्पर्धा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनखाली पाणीपुरवठा अभियंता शीतल जाधव यांनी पार पाडली. यावेळी नगरपरिषदे कडून प्रशासन अधिकारी श्री. लांडे, नगरपरिषद शाळा प्रशासन लिपिक श्री. जयदीप कांबळे, शहर समन्वयक श्री.किरण आरडे, स्वच्छता निधीक्षक श्री. हनुमान लोखंडे, मुकादम सौ. मालन पाटोळे आदि उपस्थित होते.
अस म्हटल जात की देशाचं भविष्य शाळेच्या खोल्यात घडत असत. त्यामुळे पर्यावरणा बाबत सर्वांनी जागृत होवून जबाबदारीने वागणे ही काळाची गरज बनलेली असताना सर्व प्रथम शिक्षक वृंद आणि त्यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धना विषयी जगजगृती व्हावी या उद्देशाने या “वसुंधरा प्रश्न मंजुषा” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
*कैलास केंद्रे*
मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद