पाळीव कुत्र्याने तोडला मुलीच्या गालाचा लचका पोलीसात गुन्हा दाखल

पाळीव कुत्र्याने तोडला मुलीच्या गालाचा लचका पोलीसात गुन्हा दाखल
बेलापूर (वार्ताहर )- अंगणात खेळत असलेल्या लहान मुलीच्या चेहेऱ्यालाच पाळीव कुत्र्याने चावा घेतला असुन अहमदनगर येथील दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरु आहेत या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या बाबत पोलीस सूत्राकडून समजलेली हाकीकत अशी की पढेगाव रोड शालोम चर्चच्या पाठीमागे दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन च्या सुमारास आयेशा दस्तगीर शेख ही मुलगी ( वय वर्ष 9 ) खेळत असताना टायगर नावाच्या कुत्र्याने तिच्या तोंडाला व इतर ठिकाणी चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले गंभीर जखमी अवस्थेत मुलीला प्रथम श्रीरामपूर येथील शिरसगावच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले चेहेऱ्याची जखम फार मोठी असल्या कारणाने प्राथमिक उपचार करुन त्या मुलीस नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले जखमी आयेशास अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करुन तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे कुत्र्याने त्या मुलीच्या गालाचाच लचका तोडला असुन मुलीची तब्येत गंभीर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले या बाबत मुलीची आई निलोफर दस्तगीर शेख हिने बेलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून बेलापुर पोलीसांनी शेलार यांच्या विरुद्ध भा द वि कलम २८९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास बेलापुर पोलीस करीत आहे.