न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे इयत्ता आठवी एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेतील ऐतिहासिक भरारी.

न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे इयत्ता आठवी एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेतील ऐतिहासिक भरारी.
एन.एम.एम.एस.परीक्षा – 2021-22 चा अंतीम निकाल जाहीर झाला आहे.त्यात इयत्ता आठवी मधील विद्यालयातून एकूण 42 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 26 विद्यार्थी पात्र झाले आहेत.विद्यालयाचा शेकडा निकाल 61.90 % लागला आहे.हापसे विराज ऋषिराज 139 गुण मिळवून प्रथम तर 123 गुण मिळवून नवले प्रज्वल बापुसाहेब व्दितीय आणि कोकणे सार्थक ज्ञानेश्र्वर व पटारे हर्षद भीमराज यांनी 104 मिळवत तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे.
विद्यालयामध्ये सर्व पात्र विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व विषय शिक्षक काळे एस. जी.(विद्यान), पिदुरकर एन. आर.(समाजशास्त्र), टेकाळे ए. जे.(गणित) व विभाग प्रमुख कोकाटे एस.पी.(बुध्दीमत्ता) यांचा सत्कार समारंभ आज आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने , उत्तर विभागीय अधिकारी कन्हेरकर सहायक विभागीय अधिकारी तापकीर साहेब व वाळुंजकर साहेब, बापूसाहेब पटारे माजी सरपंच मजाबापू थोरात, टाकळीभान सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाराजी पटारे ,विद्यालयाचे प्राचार्य इंगळे बी. टी. पर्यवेक्षक बनसोडे ए. डी. जयकर मगर पंचक्रोशीतील पालक आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य इंगळे बी.टी.यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बनसोडे ए.डी.यांनी केले. व आभार प्रदर्शन पाचपिंड ए. ए. यांनी केले.