रिक्षा चालकांच्या पाठीशी शिवछत्र परिवार उभा आहे विजयसिंह पंडित

रिक्षा चालकांच्या पाठीशी शिवछत्र परिवार उभा आहे विजयसिंह पंडित
शिवछत्र रिक्षा असोशिएशनचे शानदार उद्घाटन
शिवछत्र रिक्षा असोसिएशन हे राजकारणविरहित काम करणार असून रिक्षा चालक आणि मालक यांच्या पाठीशी शिवछत्र परिवार सदैव भक्कमपणे उभा राहील, सामान्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून काम करू असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. शिवछत्र रिक्षा असोसिएशनचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
गेवराई येथील मोंढा नाका येथे बीड जि. प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते ”शिवछत्र रिक्षा असोसिएशन” चे उद्घाटन करण्यात आले. रिक्षा चालक व मालक यांनी बऱ्याच दिवसापासून विजयसिंह पंडित यांच्याकडे नोंदणीकृत रिक्षा असोसिएशन करून देण्याची मागणी केली होती. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे अधिकृत नोंदणी करून शिवछत्र रिक्षा असोशियनला मान्यता घेण्यात आली. आज या असोसिएशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शांतीलाल पिसाळ, दत्ता पिसाळ, किशोर कांडेकर, सरवर पठाण, शाहरुख पठाण, महादेव बेद्रे, संदीप मडके, सुनील पिसाळ, सय्यद शारिख, कांता नवपुते, गोरख शिंदे, मुनिर शेख, वसीम फारोकी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, रिक्षा चालक आणि मालक यांच्या मागण्या संदर्भात आपण सदैव काम करु. ईथे राजकारण केले जाणार नाही. सर्वांना आपण सहकार्य करु. शिवछत्र रिक्षा असोसिएशन च्या वतीने विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवछत्र रिक्षा असोसिएशनच्या अध्यक्ष पदी दत्ताभाऊ पिसाळ, उपाध्यक्ष पदी राजाभाऊ धापसे तर सचिव कट्टू भाई यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला गोपाळ पिसाळ, अशोक फुलशंकर, हनिफ पठाण, राजाभाऊ धापसे, सुरेश इंदलकर, संदीप प्रभाळे, कैलास पिसाळ, गफार फिटर, शेख जावेद, प्रेम तांबोळी, जाकीर शेख, राम धोत्रे, सुरेश घोंगडे, किशोर शेरकर, अजीम पठाण, ज्ञानदेव सुतार, जलाल भाई यांच्यासह रिक्षा चालक व मालक मोट्या संख्येने उपस्थित होते.