संस्कारांची मुळ घट्ट झाली तर व्यसनाधीनता आपोआप संपुष्टात येईल गणेश खाडे

*संस्कारांची मुळ घट्ट झाली तर व्यसनाधीनता आपोआप संपुष्टात येईल गणेश खाडे
संस्कारांची पाळ मुळ मजबूत झाल्याशिवाय व्यसनाधीनता मुळा सह नष्ट होणार नाही . त्या साठी संस्कार आणि संस्कृती बळकट होण गरजेचं आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली व्यसनाधीनता हि आपली पाळंमुळं घट्ट करत आहे.आणि याच दरम्यान संस्कार व संस्कृती कमकुवत दुबळी होत आहे.आशा वेळी आपण मात्र बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही . व्यसनाधीनतेची हि पाळंमुळं योग्य वेळी नष्ट केली तरच भविष्यातील अनेक पिढ्यांनच भविष्य सुरक्षित होईल.महणुन व्यसन मुक्ती हि काळाची गरज आहे.समाजिक संस्कार मजबुत झाले तर ते व्यसनाधीनते सारखी गंभीर समस्या आपोआप संपुष्टात येईल असं मत मुक्ताई व्यसन मुक्ती केंद्र उस्मानपुरा संभाजी नगर या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती मेळाव्याचे दिनांक 11/2/2023 शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता उद्घाटन पर मार्गदर्शन करताना वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक गणेश खाडे यांनी व्यक्त केले.समाज सेवक तथा वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती अभियानाचे राज्य समन्वयक सुनीलजी नागरगोजे यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेल्या या व्यसन मुक्ती मेळ्यासाठी अध्यक्ष म्हणून जय अवजीनाथ सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी करपे तसेच प्रमुख अतिथी म्हणून यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. व्यसन हे सामाजिक विकासातील सगळ्यात मोठा अडथळा असुन हिच व्यसनाधीनता आज विदारक रूप धारण करून अगदी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पासुन ते तरूण तरूणी या सगळ्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे.आणि हिच परस्थिती कायम पुढे राहिली तर खूप मोठी भिषण परस्थिती निर्माण होईल परीणाम स्वरूप भविष्यात सामाजिक पातळीवर खुप मोठ नुकसान होईल .हे नुकसान टाळण्यासाठी सामाजिक पातळीवर व्यापक जनजागृती होण आवश्यक आहे. सामाजिक पातळीवर आध्यत्मिक ज्ञान व सामाजिक संस्कृती चे पाळमुळ मजबूत केल्याशिवाय व्यसनाधीनता कायमची संपुष्टात येणार नाही. म्हणून धर्म संस्कार आणि संस्कृती हि घराघरात मनामनात रूजली पाहिजे . संस्कारा पेक्षा सर्व श्रेष्ठ असं काहिच नाही हि भावना जागृत झाली पाहिजे. जेणेकरून कुसंस्कार आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीत.समाजिक संस्कृतीचा पाया मजबूत झाला कि आपोआप अनेक सामाजिक विकार हे कायमचे संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाहीत. त्या अनुषंगाने सामाजिक विकास व संस्कृतीक विकास या सह आध्यत्मिक ज्ञान मार्गावर मार्गक्रमण करण गरजेचे आहे. संस्कार आणि संस्कृती यांची पाळ मुळ मजबूत झाल्याशिवाय खरी संस्कृतीक जीवनमूल्ये समजावणार नाहीत .खरी जीवनमूल्ये समजली कि मग मात्र कोणीही सहजासहजी व्यसनाधीनतेच्या आहारी जाणार नाही. मुळात आपला धर्म आपल सामाजिक तत्त्वज्ञान ज्या वर आपण उभा आहेत त्यांची उंची समजली आणि जाणवली तर त्याच उल्लंघन होईल असं कोणीही वागणार नाही म्हणून धर्म संस्कार धर्म संहिता या बाबी दिवसेंदिवस अधिक बळकट होण गरजेचं आहे. झाडाला किड लागली तर कितीही मजबूत झाड कहि दिवसांत कोसळत तसंच व्यसनाधीनता हि खुप घातक अशी किड आहे ज्या किडीनी सर्व वयोगटातील समाज पोखरारयला चालू केला आहे.हि किड आपल्या पर्यंत येण्यासाठी फार वेळ लागणार नाही.त्यासाठी या किडीचा बंदोबस्त कायमचा करण्यासाठी सामाजिक संस्कार आणि आध्यत्मिक ज्ञान वृद्धी या पेक्षा प्रभावी दुसरा कोणताही पर्याय उपाय नाही. संस्कारांची मुळ घट्ट झाली कि आपोआप हि सगळी किड नष्ट होईल