संक्रापुर येथील जाधव ट्रांन्सफार्मरला दवणगाव येथुन विज पुरवठा जोडावा शेतकऱ्यांचे महसुल मंत्र्यांना साकडे

संक्रापुर येथील जाधव ट्रांन्सफार्मरला दवणगाव येथुन विज पुरवठा जोडावा शेतकऱ्यांचे महसुल मंत्र्यांना साकडे
बेलापुर (प्रतिनिधी )-संक्रापुर तालुका राहुरी येथील जाधव वस्तीवरील जाधव ट्रान्सफार्मरला कोल्हार फिडरवरुन विज पुरवठा होत असल्यामुळे कमी दाबाने विज मिळत असुन जवळील दवणगाव फिडर मधुन विज पुरवठा केला जावा अशी मागणी संक्रापुर येथील शेतकऱ्यांनी राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बेलापुर येथील कबंड्डी स्पर्धेच्या उद़्घाटनाकरीता आले असता संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटुन आपल्या व्यथा मांडल्या पाणी असुनही विज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे अनेक समस्याचा सामना करावा लागत असुन संक्रापुर येथील जाधव डी पी ला कोल्हार येथुन विज पुरवठा केला जातो हे अंतर फार मोठे असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दाबाने विज पुरवठा होतो त्याचा परिणाम विज मोटारी जळणे ट्रांन्सफार्मर जळणे अशा घटना वारवार घडत आहे त्यामुळे पाणी असुनही पिके जळून चाललेली आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या ट्रांन्सफार्मरला जवळील दवणगाव फिडर मधुन विज पुरवठा जोडण्यात यावा जेणे करुन विज मोटारी जळणे ट्रांन्सफार्मर वेळोवेळी नादुरुस्त होणे असे प्रकार होणार नाहीत अशी मागणी शेतकऱ्यांनी नामदार विखे यांच्याकडे केली आहे आपण वैयक्तिक लाक्ष घालुन आमची समस्या सोडवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,पत्रकार देविदास देसाई , नबाजी जगताप ,कल्याणराव जगताप राजाभाऊ थोरात, विकास पा थोरात पंडीतराव थोरात, संजय जगताप, राजेंद्र जगताप ,विश्वनाथ जगताप, शशिकांत माकोने ,नंदकुमार लोंढे, बाळासाहेब जाधव ,नारायण जाधव, बाळासाहेब गुंड, सुभाष दाते, वसंत बर्डे आदि शेतकरी उपस्थित होते.