पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार डोईफोडे सेवानिवृत्त*

*आळंदी पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार डोईफोडे सेवानिवृत्त*
आळंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार बबन डोईफोडे यांची कार्यकाल पूर्ण झाल्याने सेवानिवृत्ती झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यांना आयुक्तालयात सेवानिवृत्ती निमित्त सन्मानित केले. त्याचबरोबर ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या आळंदी पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत त्यांना समाधानाचा धक्का दिला.ज्या ठिकाणाहून सेवानिवृत्त झाले त्या ठिकाणी सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार करण्यासाठी पोलीस दलातील सर्व सहकारी उपस्थित पाहून डोईफोडे यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्याचबरोबर आपले सहकारी सेवानिवृत्त होत आहेत. या जाणिवेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे हे आपल्या भावुक भावना लपवू शकले नाहीत.
देशभक्तीपर गीते लावत त्यांच्या सन्मानार्थ विशेष आयोजन.तसेच सत्कारासाठी सर्व उपस्थित सहकारी महिला पोलीस. हवालदार. सहायक फौजदार. पोलीस नाईक. पोलीस शिपाई .यांना पाहून निवृत्त सहाय्यक हवालदार डोईफोडे यांना एक वेगळा आनंद झाल्याचे त्यांचे चेहऱ्यावर जाणवत होते. त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांबरोबर आता काम करता येणार नाही. ही भावनाही त्यांच्या निशब्द चेहऱ्यावर दिसून येत होती. त्यांच्या सन्मानार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी विशेष सत्काराचे आयोजन करत.आपला एक सहकारी सेवानिवृत्त होत आहे. आणि निवृत्तीचे जीवन जगणार आहे.
यासाठी विशेष शुभेच्छा साठी केलेल्या आयोजन याबाबत डोईफोडे यांच्या चेहऱ्यावर वेगळे समाधान दिसत होते.सदर निरोप समारंभाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे. पोलीस निरीक्षक बी एम जोंधळे. महिला निरीक्षक माने.सहाय्यक फौजदार गाडेकर. सहाय्यक फौजदार कोतवाल. हवालदार पाटील. हवालदार कावळे. हवालदार जाधव. गोपनीय बार निशी विभाग चे हवालदार मच्छिंद्र शेंडे. हवालदार डोमाळे. महिला पोलिस हवालदार मस्के. पोलीस हवालदार कुरे.पोलीस हवलदार भोंडवे. पोलीस हवालदार पालवे. या सर्वांनी डोईफोडे यांना शुभेच्छा दिल्या. काहींनी मनोगत हि व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आनंदा बरोबरच भाऊक तेच वातावरण आळंदी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पाहण्यास मिळाले.