गुन्हेगारी

वनविभागाची दमदार कामगिरी  राहत्या घरातून सांभर प्रजातीची शिंगे व जबडा जप्त पित्ता पुत्रावर गुन्हा दाखल

वनविभागाची दमदार कामगिरी 

राहत्या घरातून सांभर प्रजातीची शिंगे व जबडा जप्त

पित्ता पुत्रावर गुन्हा दाखल

घरातील हॉलमध्ये अथवा बंगल्यांच्या बैठक खोलीत, दर्शनी भागात शोभेची वस्तू अथवा बडेजाव म्हणून काहींना जंगली प्राण्यांची शिंगे, दाते, हाडे, कातडे, सांगाडा, मुखवटे लावण्याचा शौक असतो. मात्र, हाच हव्यास पोटी आपल्याला किती भारी पडू शकतो याची प्रचिती थेरगावातील एका उद्योजकावर आली. त्याने घरात सांभर प्रजातीच्या प्राण्याची शिंगे व तोंडाचा सांगाडा लावल्याने मुळशी वनविभागाने त्याच्या घरावर छापा मारत कारवाई केली.

मुळशीच्या वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 31जानेवारी रोजी थेरगावातील शिव कॉलनी लेन नंबर २बी, मधील सुरेश आप्पा नाईक धनश्री बंगलोवर मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण तसेच घोटावडे येथील वनपाल यांच्यासह वनविभागाच्या पथकाने धाड मारून घराची झडती घेतली असता, सांभर प्रजातीच्या वन्यप्राण्याची शिंगे तोंडाच्या सांगाड्यासह आढळून आली. प्रथमदर्शनी सदर शिंगे लाकडापासून तसेच पीओपी असून घरामध्ये शोपीस म्हणून बनवलेली लावलेली असा बनाव निर्माण करण्यात आला.परुंतु तपासणी केली असता सदरची शिंगे ही सांबर या प्रजातीचीच असून आरोपीला ताब्यात घेतले असता शिंगे हे वीस वर्षापासून घरामध्ये असल्याचे कबूल केले आरोपी यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972चे कलम 39,50,51 नुसार करण्यात आला असून सदरची कारवाई मुळशी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल घोटावडे, प्रज्ञा बनसोडे, वनरक्षक पांडुरंग कोपणार, संतोष मुंडे इतर कर्मचाऱ्यांनी केली पुढील तपास उपवन संरक्षक पुणे वन विभागपुणे श्री राहुल पाटील, तसेच सहा वनसंरक्षक पुणे श्री मयूर बोठे, यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण तपास करीत आहे

कोट वन्य जीवाची शिकार करणे, तस्करी करणे किंवा वन्यजीवांचे अवशेष जवळ बाळगणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा असून 7 सात वर्षे पर्यंत कारावासाची शिक्षा केव्हा द्रव दंड किंवा दोन्ही होऊ शकते अशा घटना निर्धनास आल्यास तात्काल वन विभागाची संपर्क करा चव्हाण विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर 1926 वर कळवा संतोष चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी पौड

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे