अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान,पंचनामे करण्याचे तहसीलदार यांचे आदेश.

टाकळीभान मध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
टाकळीभान प्रतिनिधी – गुरुवारी रात्री १० वाजता झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषध फवारणी केल्या होत्या मात्र काल रात्री वाऱ्यासोबत पावसाची सुरुवात झाली. आणि उभे पिके जमीन दोस्त झाली. व होत्याचे नव्हते झाले. सर्वात जास्त नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर महिन्यात पेरणी झालेल्या गहू पिकाला पावसाचा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या क्षेत्राचा शंभर एकर पेक्षाही जास्त गहू पिकाचे नुकसान झाले आहे.
रतनबाई बोडखे, विकास मगर, बापूसाहेब कोकणे, शकुंतला पटारे, निलेश मगर, संभाजी पटारे, अमित सटाले, धनराज कोकणे, कारभारी बोडखे, दविद रणनवरे, संगीता सपकाळ, अंजनाबाई कोकणे, संजय रणनवरे यासह बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
ʼʼझालेल्या नुकसानीचे कामगार तलाठी यांना पीक पहाणी करून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत – प्रशांत पाटील, तहसीलदार