सर मला लोकशाaहीचे मुल्य पायदळी तुडवून मारतात’
सर मला लोकशाहीचे मुल्य पायदळी तुडवून मारतात’
प्रजासत्ताक दिनी प्रत्येक गावातील शाळेत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले असते. सकाळी झेंडावंदन होते, यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांची भाषणं होतात. पण सध्या सोशल मिडीयावर एका विद्यार्थ्यांचे भाषण प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेले भाषण एका लहान मुलाचे आहे. संविधान लोकशाही या विषयावर त्याने भाषण केले आहे. या भाषणात या मुलाने लोकशाहीची काही खास उदाहरणे देत प्रेक्षकांना लोटपोट केले आहे. अगदी सोशल मिडीयावरील नेटकरी देखील त्याच्या प्रेमात पडली आहेत. “लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा करतो, माकडासारखा झाडावर चढतो तर लोकशाही असल्यामुळे मला माझे वडील काहीच बोलत नाहीत. पण गावातील काही मुलं माझं नाव शाळेतील सरांना सांगतात आणि काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसंच सर देखील मला पायदळी तुडवतात. पण मी खूप गरिब आहे, माझ्याएवढा गरिब अख्ख्या तालुक्यात कुणीच नसेल” अशा शब्दांत या विद्यार्थ्यांने भाषण केले आहे. त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
या मुलाने लोकशाहीचे महत्व सांगताना दिलेली उदाहरणे अशी जबरदस्त होती की, ही उदाहरणे ऐकून समोर बसलेल्या शिक्षक, विद्यार्थ्यांना हसू आवरता आलेले नाही. या भाषणाने या चिमुकल्याने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.