*नवीन मुख्याधिकारी यांचे,नवीन वर्षात, नव उमेद असणाऱ्या तरुण माजी नगरसेवकांकडून कार्यालयात स्वागत,*

*नवीन मुख्याधिकारी यांचे,नवीन वर्षात, नव उमेद असणाऱ्या तरुण माजी नगरसेवकांकडून कार्यालयात स्वागत,*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी नगरपरिषद चे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांची बढती झाल्याने, त्यांचे जागी नवीन मुख्याधिकारी म्हणून कैलास केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, कैलास केंद्रे यांनी सांगोला नगरपरिषदेत यापूर्वी काम पाहिले असून,त्यांना तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेचा पदभार देण्याचे शासकीय आदेश मिळाले आहेत,तसेच पूर्वीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी संयम,शिस्त ,आणि नियम यांचा संगम घालत केलेल्या कामाचेही आळंदीकर यांनी दखल घेत कौतुक केले आहे,अंकुश जाधव यांच्या काळामध्ये विविध महत्वाचे प्रश्न असतेले म्हणजे पाणी प्रश्नावर त्यांनी विशेष लक्ष देत काम केले होते,तत्पर आणि शिस्तबद्ध काम करण्यासाठी अंकुश जाधव मुख्याधिकारी यांना ओळखले गेले, नूतन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे आळंदी नगरपरिषदेत तरुण उमेद असणाऱ्या माजी नगरसेवक यांनी स्वागत केले,यामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, शिवसेनेचे शहर प्रमुख अविनाश तापकीर,शिवसेना जिल्हा पदाधिकारी संदीप पगडे, आळंदी नगरपालिकेचे माजी नगरसेवक गटनेते प्रशांत दादा कुऱ्हाडे, भारतीय जनता पार्टीचे माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश घुले,यांनी आज आळंदी नगरपरिषद कार्यालयात स्वागत केले,यावेळी नवीन मुख्याधिकारी केंद्र यांनी आळंदी नगर परिषदेची तांत्रिक माहिती घेतली,एकूण नगरसेवक किती,स्वीकृत नगरसेवक किती,कार्यकाल कधी संपला,पूर्वीचा कार्यकाल, निवडणूक,याची रूपरेषा यांची माहिती घेतली,
या तरुण माजी नगरसेवकांकडून विचार विनिमय करत चर्चाही झाली,यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी तसेच प्रशांत दादा कुऱ्हाडे यांनी आळंदी नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारत ही सुसज्ज आणि सुविधा बध्ध व्हावी यासाठी लक्ष घालण्याची विनंती,केंद्रे यांना केली आहे,
त्याचबरोबर शिवसेना शहर प्रमुख अविनाश तापकीर यांनी वाहनताळाबाबत आपण वेळीच लक्ष घालून योग्य ते आदेश काढावेत, असे सांगत त्या ठिकाणी लक्ष वेधले संबंधित सर्व तरुण उमेदीच्या माजी नगरसेवकांना समोर पाहून मुख्याधिकारी केंद्र यांनीही काम करण्यास स्फूर्ती मिळेल अशी भावना व्यक्त केली आहे,दरम्यान आळंदी नगरपरिषद कार्यालयातील आजचा पहिला दिवस असल्याने सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, अविनाश तापकीर, संदीप पगडे, काळजे,तसेच विविध प्रकारच्या लोकांनी,संघटनेच्या लोकांनी, केंद्रे यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले आहे,