*आपला जन्म इतरांशी तुलना करण्यासाठी नसुन तो सत्याची कास धरणारा*

*आपला जन्म इतरांशी तुलना करण्यासाठी नसुन तो सत्याची कास धरणारा*
इतरांनी आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व समजुन आपल्याकडे पाहुण आपल्या सारखं आचरण केल पाहिजे.अस व्यक्तिमत्व आपण आपलं घडवलं पाहिजे .म्हणजेच आपण सत्याची अभिव्यक्ती झालं पाहिजे.पण आपण असं न करतां इतरांच्या सोबत आपली तुलना करण्या मध्येच धन्यता मानतो आणि इथेच अडकून पडतो . मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हेच आपण विसरून जातो हि आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
आपला जन्म जिथे झाला आपण जिथे राहतोय वावरतोय घडतोय त्या परिसरात कार्यक्षेञात असणारी वावरणारी इतर मंडळी आपल्या पेक्षा लहान असो वा थोर सर्व प्राणीमात्र हे आपल्यासाठी वंदनीय पुजनीय आदरनीय असलीच पाहिजे. असं आपल्या एकंदरीत सर्व धर्म ग्रंथातील तत्वज्ञान सांगतं तसेच आपले महापुरुष साधु संत महंत सुद्धा हिच मानवतावादी शिकवणं देतात.आणि शेवटी आपली सद्सद्विवेक बुद्धी सुद्धा हे सत्य जाणून आहे. तसेच हा अलिखित संकेत पण आहे .
पण खंरच आचरण करताना हा संकेत कोणी पाळत का तर शक्यतो खूप कमी म्हणजे अगदी नगण्य लोक हा संकेत पाळतात परंतु बहुतांश लोक हे या संकेतापासुन कोसो दुर असुन आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ कसे हेच प्रकट करण्या मध्ये आपला बहुतांश वेळा वाया घालवतात वास्तविक आपला वेळ हा जीवनात अनमोल असतो . आणि अनमोल वेळ हा सत्कारणी लागला पाहिजे पण असं शक्यतो होत नाही.अनमोल वेळ मग सत्कारणी लागण्याऐवजी व्यर्थ जातो आणि आपण नको त्या विषया भोवती फिरू लागतो . आणि इथुनच आपल्या जीवनाची दिशा बदलते मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.
विषय कोणताही असो क्षेत्र कोणतही असो त्या क्षेत्रातील सहभागी व्यक्ती त्याच क्षेत्रातील इतर व्यक्ति पेक्षा मी किती उत्कृष्ट अति उत्कृष्ट आणि चांगला आहे हे दाखवण्यासाठी अहोरात्र धडपडत असतात मग शेवटी प्रश्न असा पडतो कि आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे तो काही फक्त मी इतरां पेक्षा श्रेष्ठ कसा आहे हेच सिद्ध करण्यासाठी नाही हेच आपल्या लक्षात येत नाही हेच दुर्दैव असुन आपला जन्म हा सत्याची अभिव्यक्ती होण्यासाठी झाला आहे हेच मुळात वास्तविक सत्य आज बहुतांश लोकांना समजायला तयार नाही.आश्चर्यकारक बाब आहे प्रत्येकजण आपण इतरांन पेक्षा श्रेष्ठ कसे आणि किती हे गणित जुळविण्यात व्यस्त आहे.पण इतरांचा संदर्भ हा कशासाठी स्वतः बदल आपलं मत असण योग्य आहे त्या मध्ये फार काही हरकत नाही. पण आपण वारंवार बहुतांश वेळा आपली तुलना इतरांशी करत बसणं म्हणजे काय तर आपण मुळात आपल्या मुख्य उद्देश पासुन दुर जाण.
आपण सत्याची अभिव्यक्ती होण्यासाठी या सृष्टीवर आलो आहोत .आपण इतरांसाठी आदर्श पथ निर्माण करण्यासाठी आलो आहोत लोक कल्याण करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्यासाठी आपण इथं आलो आहोत मग आपण एवढ्या शुल्क आणि किरकोळ विषयात कसे अडकून पडतो. पण असं होण खरंय अर्थाने योग्य नाही.आपण आपली तुलना इतरांशी करत बसण्यापेक्षा स्वतःच सत्याची अभिव्यक्ती व्हावं आणि लोकांसाठी आदर्श पथ निर्माण करावा हेच जीवन उपल्बधी आहे.