इतर कारखान्याप्रमाणेच ऊस दर देण्याची हमी – कार्यकारी संचालक मा.सुशीलकुमार देशमुख..!!

प्रसाद शुगर चे विनाकपात पहिली उचल रुपये २३००/- प्रमाणे ऊस बिल पेमेंट बँकेत वर्ग ;
इतर कारखान्याप्रमाणेच ऊस दर देण्याची हमी – कार्यकारी संचालक मा.सुशीलकुमार देशमुख..!!
राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर अँड अलाईड ऍग्रो प्रॉडक्टस् लिमिटेड वांबोरी कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२२-२३ मद्ये आलेल्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील शेतकऱ्यांनी पुरविलेल्या ऊसास कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केल्याप्रमाणे पहिली उचल रक्कम रुपये २३००/- प्रमाणे पंधरवडा पेमेंट बँकेत वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याची कार्यकारी संचालक मा. श्री. सुशीलकुमार देशमुख साहेब यांनी दिली आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२२-२३ सध्या सूरू असून या गळीत हंगामात आलेल्या ऊसास पहिल्या पंधरवड्याचे ऊस पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेले आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगला दर मिळत असल्यामुळे या गळीत हंगामात पहिली उचल विनाकापात रक्कम रुपये २३००/- प्रमाणे वेळेत ऊस पेमेंट जमा केले आहे.
“चालु गळीत हंगामात ऊस पुरविणाऱ्या सर्व ऊस उत्पादकांना प्रथम उचल विनाकापात रक्कम रुपये २३००/- प्रमाणे व त्यानंतर जिल्ह्यातील इतर कारखाना जो अंतिम ऊस दर देईल त्याचप्रमाणे ऊस दर देण्याची हमी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. श्री.सुशील कुमार देशमुख यांनी दिली आहे.”
पहिली उचल ही अंतिम ऊस दर नसून यापुढेही जिल्ह्यातील इतर कारखाना जो अंतिम ऊस दर देईल त्याप्रमाणे चालू गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसास दर देण्याची हमी कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.
चालू गळीत हंगामात ८ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व प्रसाद शुगर कारखान्याला द्यावा कारण इतर कारखान्यांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात नुकसानही होत नाही आणि कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस उत्पादकांनी चुकीच्या,खोट्या भूलथापांना तसेच इतर तात्पुरत्या अमिषाला बळी पडू नये तसेच प्रसाद शुगर यावर्षी देखील वेळेत पंधरवडा पेमेंट करण्याची परंपरा राखणार आहेच पारदर्शक व्यवहाराचा व विकासाचा फायदा घ्यावा तसेच या गळीतहंगामासाठी नोंद केलेला सर्व ऊस प्रसाद शुगर कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.