टाकळीभानच्या याञौत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न, याञौत्सवाच्या पुर्वतयारीला वेग.

टाकळीभानच्या याञौत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न, याञौत्सवाच्या पुर्वतयारीला वेग.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रकोपामुळे ग्रामदैवताचा याञौत्सव होवु शकला नाही. माञ कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने येथील ग्रामदैवत शंभु महादेवाच्या ९ मे रोजी होणाऱ्या याञौत्सवासाठी ग्रामस्थ उत्साही आसल्याने याञौत्सवाच्या नियोजनाची बैठक काल सोमवारी महादेव मंदिराच्या प्रांगणात प्रमुख ग्रामस्थ व याञा समिती सदस्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. त्यामुळे याञौत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठीच्या पुर्वतयारीला वेग आला आहे.
टाकळीभान पंचक्रोशीचे ग्रामदैवत आसलेल्या शंभु महादेवाचा याञौत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. माञ कोरोनामुळे सलग दोन वर्षे याञौत्सव होवु शकला नसल्याने यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने याञौत्सवाची ओढ पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लागलेली आहे. अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या सोमवारी याञौत्सव साजरा होत आसल्याने ९ मे रोजी येथील याञौत्सवाला सुरावात होणार आहे. त्यासाठी प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत महादेव मंदिराच्या प्रांगणात बैठक आयोजित केली होती. यावेळी याञौत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यावर एकमत झाल्याने जेष्ठ नागरीकांच्या हस्तेशंभु महादेवाला नारळ वाढवुन याञापुर्व तयारीला सुरवात करण्यात आली. बैठकित काही मान्यवरांनी मौलीक सुचना केल्या. याञौत्सवासाठी एकदिलाने काम करुन याञौत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. मंदिर परीसर आणि याञा परीसरात कोणताही शुभेच्छा फलक न लावण्याचाही बैठकित ठराव करण्यात आला. महागाईचा निर्देशांक वाढलेला आसल्याने याञौत्सवासाठी मोठा खर्च येणार आसल्याने देणगीदारांनी सढळ हाताने वर्गणी याञा कमेटीकडे द्यावी असाही ठराव करण्यात आला. यावेळी याञेच्या तिसऱ्या दिवशी टांगा शर्यती घेण्याचे ठरले.
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, उपसरपंच कान्होबा खंडागळे, अॕड. प्रमोद वलाटे, राजेंद्र कोकणे, शिवाजीराजे शिंदे, भाऊसाहेब कोकणे, एकनाथ लेलकर, श्रीधर गाडे, भाऊसाहेब पटारे, दत्तोबा मगर, बाळासाहेब खुरुद, अबासाहेब रणनवरे, जितेंद्र पटारे, गोरखअण्णा कोकणे, बंडोपंत बोडखे, नारायण काळे, बंडोपंत हापसे, प्रकाश धुमाळ, पांडु मगर,
मोहन रणनवरे, बापुसाहेब शिंदे, अमोल पटारे, गजानन कोकणे, विशाल पटारे, बंडुतात्या कोकणे, मधुकर गायकवाड, राजेंद्र देवळालकर, विष्णुपंत पटारे, बंडुतात्या कोकणे, सुंदर रणनवरे, जाॕन रणनवरे व संविधान ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकित संविधान ग्रुपच्या वतीने पाच हजाराची देणगी घोषीत करण्यात आली.