अपघात
कार- दुचाकीचा भीषण अपघातात एक ठार*

*कार- दुचाकीचा भीषण अपघातात एक ठार*
कार आणि दुचाकीचा समोरा- समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मांजरसुंबा पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे महाजनवाडी फाट्यावर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सागर सतिश चव्हाण पुणे वरून अंबाजोगाईकडे वाहन क्रमांक एमएच ०६ सीडी २७५७ जात असताना
मौजे महाजनवाडी फाट्यावर मोटारसायकल स्वार वाहन क्रमांक एमएच २३ बी ई ३३ ९८ युनिकाॅर्न गाडीचा समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात मृत्यू झालेल्या तरुण हा अजय बबन तायेड (वय २३ ) वर्षे असं मृत तरुणाचं नाव असून तो पाटोदा तालुक्यातील वाघिरा गावचा असल्याचे समजते.