वारकऱ्यांसाठी सुविधा देण्याचे मोठे आव्हान. वारकरी भाविकांचे आरोग्य आणि 24 तास पाणी देण्यासाठी सक्षम यंत्रणा दिल्याचे समाधान – मुख्याधिकारी अंकुश जाधव*

*वारकऱ्यांसाठी सुविधा देण्याचे मोठे आव्हान. वारकरी भाविकांचे आरोग्य आणि 24 तास पाणी देण्यासाठी सक्षम यंत्रणा दिल्याचे समाधान – मुख्याधिकारी अंकुश जाधव*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी कार्तिक वारी 2022 निर्बंध मुक्त वारी होत असल्याने वारकऱ्यांना सेवा सुविधा देणे , खूप मोठे आव्हान डोळ्यासमोर होते, वारकऱ्यांना सुविधा आणि सुरक्षितता या दोन महत्त्वाच्या बाबींना केंद्रबिंदू गृहीत धरत, सक्षम यंत्रणा पुरवल्याचे समाधान मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी व्यक्त केले,आमचे प्रतिनिधीशी कार्तिक वारी 2022 बाबत बोलताना मुख्याधिकारी अंकुश जाधव म्हणाले ,की मोठ्या प्रमाणावर भाविक येतील त्या अनुषंगाने 24 तास पाणी देण्यासाठी 23 ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर टँकरची व्यवस्था करण्यात आली होती,तसेच गावठाण भागात ज्या ठिकाणी टँकर पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी गर्दीचे कारण गृहीत धरून रोज दीड तास पाणी पुरवण्यात आम्ही यशस्वी ठरलो, आणि माऊलींची सेवा केल्याचे य बाबत समाधान प्राप्त झाल.तसेच ३१० ठिकाणी मोबाईल शौचालय पुरवण्यात आली धर्मशाळांची संख्या जास्त असलेली ठिकाणे तसेच इंद्रायणी तीरी मुख्य केंद्र म्हणून आळंदी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष दक्षता घेतल्याचे समाधान मिळत आहे, त्याचबरोबर प्रदक्षिणामार्गावर 23 ठिकाणी 24 तास पाणी पुरवने कामी टँकर पॉइंट काढून वारकरी भाविकांना पाण्याची किंचितही कमतरता भासू दिली नाही , याबाबत समाधान वाटत आहे , असे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी मत व्यक्त केले आहे,रोगराई नियंत्रण राहील यासाठी रात्रीच्या शिफ्ट मध्ये वेळचे वेळी कचरा उचलणे ,डासांचा प्रभाव होऊ नये, म्हणून धुरांडाच्या वापराने फवारणी, टीसीसी पावडर चा वापर, यासाठी विशेष कामगार यंत्रणा ,यांना सूचना दिल्या, त्याच बरोबर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण, खेडच्या तहसीलदार तथा आळंदीचे प्रशासक वैशाली वाघमारे, यांच्या अध्यादेश सूचना प्रमाणे यात्रेत दक्षता घेण्यात आली, ही घेत असताना स्थानिक दुकानदारांना त्रास झाला अशाबाबत चुकीच्या बातम्या काही लोकांनी पसरवल्या, परंतु वारकरी भाविकांची अडचण होऊ नये, यासाठी दक्षता घेणे कामी आम्ही कुठेही कमी पडलो नाही, आणि ते गरजेचे होते म्हणून अतिक्रमण माध्यमातून कारवाई करणे गरजेचे होते ,याबाबत प्रशासकीय बाबतीत चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या परंतु वारकरी भाविकांची सेवा केली याचे समाधानच आहे ,असे अंकुश जाधव मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगीतले.