रस्त्यावर खोदकाम करुन मातीचे ढिगारे भर रस्त्यावर नागरिकांचे होतेय कसरत.

गणेशवाडी_ सोनई रस्त्यावर बेकायदा खोदकाम करुन मातीचे ढिगारे भर रस्त्यावर
गणेशवाडी -नेवासा तालुक्यातील गणेशवाडी ते सोनई या रस्त्यावर सध्या बेकायदा खोदकाम सुरू असुन त्याची माती ढिगारे भर रस्त्यावर पडल्याने वाहतुकीसाठी साठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्यावर सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने ट्रॅक्टर, गाड्या यांना रोज अपघात होत आहेत. जवळपास घरे असल्याने अनेकदा या घरावर, जनावरांच्या गोठ्यावर ऊस ट्रॅक्टर पलटी होऊन मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या मधोमध देखील मोठ मोठे खड्डे खोदून रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. गेली तिस वर्षानंतर चांगला रस्ता गावाला मिळाला. यांच्यावर कुणाचाच वचक नसल्याने ठिक ठिकाणी असे विघ्न संतोषी लोक रस्त्याचे नुकसान करत आहेत. पि.डब्ल्यु डि चे शंकर दुबाले यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता त्यांनी फक्त अधिकाऱ्यांना पाठवतो एवढीच उत्तरे देवुन वेळ मारुन नेताता. रस्त्याच्या नुकसानीस जबाबदार ठेकेदारावर रस्त्याच्या नुकसानीस जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ठेकेदारावर कारवाई न झाल्यास जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही संदर्भात निवेदन देणार असल्याचे गणेशवाडी व परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.